शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

ससूनमध्ये मिळणार यलो फि व्हरची लस

By admin | Published: January 05, 2015 11:04 PM

दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांमध्ये जाताना प्रवाशाला यलो फिव्हरची लस घेणे अनिवार्य आहे.

पुणे : दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांमध्ये जाताना प्रवाशाला यलो फिव्हरची लस घेणे अनिवार्य आहे. आता ही लस आणि त्याचे प्रमाणपत्र ससून रुग्णालयात मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही लस देणारे ससून हे महाराष्ट्रातील पहिले राज्य सरकारी रुग्णालय ठरले आहे.दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये यलो फिव्हरचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळतात. याचे इतर देशातून आणखी रुग्ण येऊ नयेत म्हणून या देशांनी नियम बनविले असून प्रत्येक प्रवाशाला हे लसीकरण केलेले प्रमाणपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे. सध्या पुणे शहरात केवळ विमानतळावरच ही लस उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयातही ही लस दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांची ऐनवेळी धावपळ होत होती. ससून रुग्णालयात या लसीबाबत दररोज विचारणाही होत होती. त्यामुळे ससून प्रशासनाने या लसीचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.या लसीकरण केंद्राचे उद्घाटन बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ससूनचे उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे, बधिरीकरणशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. विद्या केळकर, डॉ. विनय टापरे, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे डॉ. विकास क्षीरसागर, डॉ. संगीता शेळके, डॉ. प्राची सौंदणकर आदी उपस्थित होते.कोल्हापूर येथील विनयकुमार नागवे यांना पहिली लस देण्यात आली. दिवसभरात २२ जणांना ही लस देण्यात आली. ही लस घेण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. (प्रतिनिधी)एमआरआय थ्री टेस्टला मशीन नाही४छोटयात छोटया रोगाचे, अपघात झाल्यानंतर मेंदू, हाडांमधील अचूक रक्तस्त्रावाचे अचूक निदान करण्यासाठी आवश्यक असलेले एमआरआय थ्री टेस्टला मशीन ससून रुग्णालयात नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. ज्या रुग्णांना या तपासणीची गरज आहे त्यांना अनेकदा बाहेरून ही तपासणी करून घ्यावी लागत आहे. ४रुग्णालयाला हवा तेवढा निधीच मिळत नसल्यामुळे अनेक जुनी मशीन वापरली जात आहेत. यातील अनेक मशीनचे आयुष्यही संपले आहे. मात्र नव्या मशीन्स नसल्याने त्या वापरल्या जात आहेत. अत्याधुनिक मशीन उपलब्ध असतानाही त्या ससूनमध्ये नसल्याने रुग्णांच्या रोगाचे अचूक निदान करण्यात अडचणी येतात.