शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

होय, एटीएममधील चोऱ्या रोखणे आहे शक्य! पुण्यात आला प्रत्यय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:06 PM

गेल्या काही महिन्यात पुणे, पिंपरी, तसेच पुणे जिल्हा, नाशिक येथे चोरटे अख्खे एटीएम मशीन उचकटून नेत असल्याचे आढळून आले आहे़..

ठळक मुद्देमांजरीमधील एटीएमची चोरी सेन्सर प्रणालीद्वारे व्हिजिलन्स ठेवल्याने रोखता आली ही चोरी

विवेक भुसेपुणे : पहाटे तीन वाजता हडपसर पोलीस ठाण्यातील फोन खणखणतो, आपण मुंबईतून बोलत असून मांजरी येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील सीसीटीव्हीला एक जण चिखल लावत आहे. चोरी होण्याची शक्यता आहे ही माहिती मिळाल्याबरोबर मांजरी भागात गस्तीवर असलेले मार्शल आकाश गायकवाड, सचिन कांबळे तातडीने शोध घेऊ लागतात. काही वेळातच घुले शाळेजवळील एका एटीएममध्ये एक चोरटा एटीएम मशीनचा दरवाजा तोडून मशीन उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. गेल्या काही महिन्यात पुणे, पिंपरी, तसेच पुणे जिल्हा, नाशिक येथे चोरटे अख्खे एटीएम मशीन उचकटून नेत असल्याचे आढळून आले आहे. यातील काही टोळ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.अनेक ठिकाणी एटीएम मशीनचे शटर अर्धवट बंद असल्याचे ग्राहकांकडून समजल्यावर तेथे चोरी झाल्याचे बँकांना समजल्याची अनेक प्रकरणे दिसून आली आहेत. अशावेळी मांजरीमधील एटीएमची चोरी सेन्सर प्रणालीद्वारे व्हिजिलन्स ठेवल्याने ही चोरी रोखता आली आहे. 

ही चोरी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या मुंबईतील मॉडर्न इन्फोमॅटिकचे अधिकारी कृणाल गावडे यांनी सांगितले की, सेन्सर प्रणालीद्वारे व्हिजिलन्स ठेवल्यास एटीएममधील चोºया रोखणे सहज शक्य आहे. आमच्या कंपनीकडे एचडीएफसीबरोबर अनेक बँकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. ज्या एटीएम सेंटरची सुरक्षेची जबाबदारी आहे.त्या ठिकाणी आम्ही सेन्सर प्रणाली व कॅमेऱ्यांचा वापर करतो. त्यावर २४ तास निगराणी ठेवली जाते. असे काम करणाऱ्या अनेक कंपन्या असून आमच्याकडे भारतभरातील बँकांच्या शाखा व एटीएम सेंटरच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. तेथील एटीएम मशीन, सीसीटीव्ही कॅमेरा अथवा इतर वस्तूंना हात लावला तर आमच्याकडे अलर्ट जनरेट होतो. आमचे कर्मचारी तातडीने त्याकडे लक्ष देऊन सेंटरमध्ये आलेला ग्राहक काय करतो याची पाहणी करतात. प्रसंगी त्याला आमच्या ऑफिसमधून तेथील स्पिकरवर इशारा देतात़ तरीही त्याने ऐकले नाही तर जवळच्या पोलीस ठाण्याला तातडीने कळविले जाते.या घटनेतही त्या चोरट्याने एटीएमचे सायरन तोडले व सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल लावला. त्याबरोबर आम्ही हडपसर पोलिसांना कळविले आणि त्या चोरट्याला पकडले.
़़़़़़़ज्या एटीएम सेंटरमध्ये ही प्रणाली वापरण्यात आली आहे. त्या ठिकाणी आम्ही दरवाजाला सेन्सर तसेच आत कॅमेरे, स्पिकर बसविलेले असतात. त्याद्वारे एटीएम सेंटरच्या दरवाजाला ग्राहकाने हात लावल्यापासून तो परत जाईपर्यंतच्या सर्व हालचाली आम्ही पाहू शकतो.पुण्यातील ३०० एटीएम सेंटरमध्ये आम्ही ही यंत्रणा बसविलेली आहे. त्याचबरोबर बँकांच्या शाखा बंद झाल्यापासून त्या पुन्हा उघडेपर्यंतच्या काळात तेथे इलेक्ट्रॉनिक्स व्हिजिलन्सद्वारे आम्ही सुरक्षा पुरवत असल्याचे गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेatmएटीएमThiefचोरtheftचोरीPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही