प्रीती जाधव - ओझा पुणे: पाण्यावर पसरलेले तेलकट तवंग... वाढलेली झाडे-झुडपे....तरंगणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, पाणी व मद्याच्या बाटल्या... हे चित्र आहे कात्रज परिसरातील पेशवेकालीन तलावाचे...नगरपालिकेने नानासाहेब पेशवे तलाव परिसरात सुशोभीकरण केले. मात्र, पाण्यात साचलेल्या कचरा-घाणीमुळे हे काम तसे ‘पाण्या ’तच गेले आहे. एकेकाळी पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ समजले जाणाऱ्या या पेशवेकालीन तलावात सांडपाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पेशवेकालीन तलावाचा श्वास गुदमरत आहे. या तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे होय.. मी दुर्लक्षित झालोय.. तुमचाच पेशवेकालीन कात्रजचा तलाव अशी भावनिक साद तर हा तलाव महापालिका आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तर घालत नसेल ना...! नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्यापेक्षा अधिक आसपासच्या गावांमधील कचरा जमा झाला आहे. विशेष बाब म्हणजे या तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले असल्याने तलावाच्या कावर थर्माकॉल, प्लास्टिक, तसेच वैद्यकीय कचऱ्याचे घटकही अस्ताव्यस्तपणे पसरलेले असून हा कचरा काढून घेण्यासाठी मागणी तलावाच्या परिसरातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली आहे.या तलावाची स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे.
सुशोभित पेशवेकालीन तलाव घाणीच्या विळख्यात कात्रज येथील या तलावात गुजरवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी तसेच मांगडेवाडी आणि कात्रजच्या घाटमाथ्यावरून येणारे नाले तसेच ओढ्यांचे पाणी येते. त्यात हे ओढे ज्या गावांमधून येतात त्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन तसेच सांडपाण्याची योग्य प्रकारे व्यवस्था नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांकडून कचरा तसेच सांडपाणी या नाल्यांमध्येच सोडले जाते. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे या तलावात हे नाले तसेच ओढ्यांमध्ये साचलेला कचरा थेट या पेशवेकालीन तलावात आलेला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी येत आहे. या तलावातील पाण्यात नागरिक निर्माल्य टाकतात. याव्यतिरिक्त प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्यांचा खचही दिसून येतो. तलावाला झाडा-झुडपांनी वेढले आहे. लगतच नगरपालिकेने मुलांना खेळण्यासाठी आजी-आजोबा उद्यान उभारले आहे. दिवसा मुले खेळतात, तर रात्री या जागेचा ताबा मद्यपी घेत आहेत. मद्याच्या बाटल्या; तसेच खाद्यपदार्थांच्या पिशव्या तलावातील पाण्यात टाकण्यात येत आहेत. तलावाचे अस्तित्वच धोक्यात