पुणे : साडेतीन महिन्यांपूर्वी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री पाच बछड्यांना कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिवळा पट्टेरी वाघ आणि रिद्धी या वाघिणीने जन्म दिला होता. त्यातील एका बछड्याचा मृत्यू झाला तर उरलेली चारही बछडे सुखरूप आहेत. सोमवारी या बछडयांचा नामकरण सोहळा संपन्न झाला. बछड्यांची नावे अनुक्रमे आकाश, गुरु, सार्थक आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जन्म झाला असल्यामुळे मादी बछडीचे नाव पौर्णिमा असे ठेवले आहे. ही सर्व नावे महापौर मुक्ता टिळक यांनी ठेवली आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांचे नामकरण विधी उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पान साखर पेढे वाढून रिद्धी या वाघींनी जन्म दिलेल्या बछड्यांचे पौर्णिमा, आकाश, गुरु व सार्थक असे नामकरण करण्यात आले. साडेतीन महिन्यांपुर्वी रिद्धी या वाघिणीने पाच बछड्यांंना जन्म दिला. परंतु दुर्दैवाने एक बछड्याचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. प्राणी संग्रहालयामध्ये वाघाच्या बछड्यांचा जन्म ही मोठी उपलब्धी आहे. ......................पिवळा पट्टेरी वाघ ही राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या मंजूर अँनीमल कलेक्शन प्लँनमध्ये समाविष्ट असणारी महत्त्वाची प्रजात आहे . भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघ देशातील सर्वच प्राणी संग्रहालयामध्ये पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असल्याने प्राणी संग्रहालयाकडे सतत वाघाची मागणी असते. प्राणी संग्रहालयामध्ये वाघ आणायचा असल्यास एकतर प्राणी अदलाबदल कार्यक्रमाद्वारे इतर मान्यता प्राप्त प्राणी संग्रहालयातून आणावा लागतो. अथवा प्राणी संग्रहालय अंतर्गत यशस्वी ब्रिडींग द्वारे वाघाची पैदास करावी लागते. प्राणी संग्रहालयामध्ये केवळ पाच वाघ आहेत. त्यामुळे वाघाच्या आवश्यक संख्येचा समतोल राखण्यासाठी प्राणी संग्रहालय व्यवस्थापन समिती प्रयत्नशील होती. तत्पूर्वी बगीराम आणि रिद्धी या वाघाच्या प्रजननक्षम जोडीकडून अथक प्रयत्न करून मनोमिलन घडवून आणण्यात प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाला यश आले. नर- मादी मध्ये गर्भधारणा होऊन १०५ दिवसांच्या कालावधीनंतर पाच पिल्लांचा जन्म झाला.
हो.... आज आमचं बारसं झालं...!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 2:42 PM