पुणे : या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुणे वाहतूक पाेलिसांकडून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत हाेती. चाैकाचाैकात थांबलेले पाेलीस कारवाई करतच हाेते, त्याचबराेबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील कारवाई करण्यात येत हाेती. त्यातच शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने लाखाे पुणेकरांवर या काळात कारवाई करण्यात आली. अखेर मुख्यमंत्र्यांनी चाैकाचाैकात गटाने थांबून कारवाई करण्यापेक्षा सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाईच्या सुचना पाेलिसांना केल्या. त्यानंतर आता पाेलिसांनी वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी सीसीटिव्ही असलेल्या चाैकांमध्ये वाहनचालकांना बाेर्डच्या माध्यमातून सुचना केली आहे.
पुण्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतीये. त्यातच नियम माेडणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. चाैकात वाहतूक पाेलीस नाहीत म्हंटल्यावर सिग्नल माेडणारे अनेक महाभाग असतात. तसेच झेब्रा क्राॅसिंगवर उभे राहून पादचाऱ्यांना चालायला जागा न साेडणारे देखील अनेकजण असतात. या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पाेलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यास सुरुवात केली. पाेलीस आयुक्तालयात नियम माेडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुद्धा कार्यरत आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून झेब्रा क्राॅसिंगवर थांबणारे, सिग्नल माेडणारे, हेल्मेट न घालणारे, विरुद्ध दिशेने येणारे यांच्यावर कारवाई करण्यात येते. नियम माेडल्याचा संदेशच थेट वाहनचालकांच्या फाेनवर याद्वारे पाठवला जाताे.
हेल्मेट सक्तीमुळे वाहतूक पाेलिसांना पुणेकरांच्या राेषाला सामाेरे जावे लागले हाेते. पुण्यातल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत कारवाई मागे घेण्याची विनंती करण्यात आली हाेती. त्यावर मुख्यंमत्र्यांनी चाैकाचाैकात घाेळक्याने थांबून कारवाई न करता सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सुचना पाेलिसांना दिल्या. आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. त्यातच वाहनचालकांनी नियमांचं पालन करावं यासाठी सीसीटिव्ही असलेल्या काही चाैकांमध्ये सुचना करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर बघून तरी वाहनचालक नियमांचं पालन करतील अशी आशा आता वाहतूक पाेलीस करत आहेत.