'बस - विमानाची सोय तुम्हीच करा', भारताने युक्रेनमधील मुलांना सोडले वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:30 PM2022-02-25T22:30:30+5:302022-02-25T22:35:01+5:30

तब्बल 20 किलो मिटर चालत जाऊन गाठावे लागते पोलंड,  रुमानीया

You just arrange for the plane India leaves children in Ukraine to fend for themselves | 'बस - विमानाची सोय तुम्हीच करा', भारताने युक्रेनमधील मुलांना सोडले वाऱ्यावर

'बस - विमानाची सोय तुम्हीच करा', भारताने युक्रेनमधील मुलांना सोडले वाऱ्यावर

Next

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : माझ्यासह आपल्या पुणे जिल्ह्यातील सुमारे 25 ते 30 विद्यार्थी येथील मेडिकल युनिव्हर्सिटीत शिकत आहोत. काल पर्यंत भारतीय दूतावासाकडून तुम्ही कुठेही जाऊ नका आम्ही सोय करतो असे सांगण्यात येत होते. परंतु आज आम्ही आपल्या दूतावासाशी संपर्क केला असता तुमची सोय तुम्हीच करा असे सांगण्यात आले. सध्या भारतात परतण्यासाठी आम्हाला पोलंड किंवा रुमानीया मार्गे यावे लागेल. परंतु युक्रेन येथून बस केल्यानंतर ते पोलंड,  रुमानीयाजवळ 20 किलो मिटर अलीकडेच सोडून देतात. यामुळे विद्यार्थ्यांची अडचण खूप वाढली असून, लवकरात लवकर आम्हाला आपल्या देशात घेऊन जा, तुम्ही काही तरी करा, अशी भावनिक साद पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मंदिरा खत्री व मलायिका चव्हाण या मेडिकलच्या विद्यार्थिनी लोकमतशी बोलताना सागितले.

सध्या रशिया व युक्रेनचे युध्द सुरु असून,  पुणे जिल्ह्यातील तब्बल शंभरहून अधिक विद्यार्थी मेडिकल व अन्य शिक्षणासाठी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यापैकी काही मुला-मुलीशी लोकमतने संपर्क करून परिस्थितीचा आढावा घेतला. जुन्नरची मंदिरा खत्री विनितसिया नॅशनल पिरोगोव्ह मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसच्या तिस-या वर्षांत शिकत आहे. तर मलायिका चव्हाण एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांत शिकत आहे. याबाबत मंदिरा खत्री यांनी सांगितले की, काल रात्री आमच्या शहरामध्ये रेड अलर्ट देण्यात आल्याने आम्हाला बकरचा असरा घ्यावा लागला. आम्ही सर्व विद्यार्थी आपल्या दूतावासाशी संपर्कात आहोत.

बसची सोय करणे; आमच्या समोर मोठी समस्या

भारतीय दूतावासाकडून काल पर्यंत आम्ही पोलंड,  रुमानीया पर्यंत सोडविण्यासाठी बसची सोय करतो असे सांगितले होते. दोन दिवस काही बस सोडल्या देखील,  पण आज आम्हाला तुमची सोय तुम्हीच करा असे सांगितले. आता आमच्या समोर मोठी समस्या तयार झाली आहे, बसची सोय करणे, पुन्हा 20 किलोमीटर चालत जाणे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही करा आम्हाला परत आपल्या देशात घेऊन जाण्याची सोय करा अशी भावनिक साद देखील या मुलींनी लोकमतला घातली.

Web Title: You just arrange for the plane India leaves children in Ukraine to fend for themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.