शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तु मला आवडतेस, केबिनमध्ये चल; पालिका अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 3:20 PM

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याने माझ्याशी अनेकदा गैरवर्तन केलेले असून शरीर सुखाची मागणी करत असल्याचीही महिलेची तक्रार

धायरी : मी तुला नोकरीत सवलत देतो,तुला वेळोवेळी सुट्ट्या देतो, तु मला खुप आवडतेस, माझे तू एक काम कर, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल, असे म्हणत पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने सहकारी कर्मचारी महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहिता ७४ नुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गणपत लाड (वय :५५ वर्षे, रा. कर्वेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ३० सप्टेंबर रोजी महिला कर्मचारी कार्यालयात एकटी असताना चंद्रकांत लाड त्या महिला कर्मचाऱ्याकडे गेला व केबिनमध्ये येण्यास सांगू लागला. त्यावेळी संबंधित महिलेने केबिनमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर," मी तुला कामात सुट देतो. पाहिजे तेव्हा सुट्टी देतो. त्यामुळे तू माझे एक काम कर, केबिनमध्ये चल," असे चंद्रकांत लाड त्या कर्मचारी महिलेला म्हणाला.

दरम्यान घाबरलेल्या महिलेने ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय याबाबत अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सिंहगड रस्ता परिसरात खळबळ उडाली असून या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तक्रारदार महिलेची राज्य महिला आयोगाकडे तक्रार...

संबंधित तक्रारदार महिला हि गेल्या दीड वर्षांपासून सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कायमस्वरुपी सेविका म्हणून कामास आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याने माझ्याशी अनेकदा गैरवर्तन केलेले असून शरीर सुखाची मागणी करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच यापूर्वी सुध्दा त्यांच्यावरती गैरवर्तनाच्या तक्रारी असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगाकडेसुद्धा तक्रार दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगcommissionerआयुक्तWomenमहिला