जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरणाच्या बॅक वॉटरमध्ये अंघोळीसाठी मुंबईचे चार तरुण गेले होते. त्यातील एक जण पाण्यात बुडाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१९ मे) रोजी सायंकाळी चार वाजता घडली. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी दिली. धरणाच्या बँकवाँटरमध्ये बुडालेल्या तरूणाचे नाव सुधाकर चंद्रकांत शिंदे (वय २९ रा.श्री दत्त दिगंबर गृहनिर्माण सोसायटी, पंतनगर, घाटकोपर, मुंबई) असे आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील चार जण अंघोळीसाठी गेले होते. त्यांच्यातला एकजण पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती जुन्नरच्या तहसिलदारांना कळविली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाची मदत मागितली आहे. ओतूर पोलीस स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेत आहेत.
पिंपळगाव जोगे धरणाच्या जलाशयात तरुण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 7:25 PM
मुंबईचे चार जण पिंपळगाव जोगे धरणाच्या बॅक वॉटरमध्ये अंघोळीसाठी गेलेलं असताना त्यांच्यातला एक जण बुडाल्याची घटना शुक्रवारी घडली.
ठळक मुद्देओतूर पोलिसांचा स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध सुरु