शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) पासून तरुण अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:12 AM

संधिवात तज्ज्ञ डॉ प्रवीण पाटील यांनी रुग्णांच्या केलेल्या पाहणीतून बाब समोर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शरीराची चुकीची ...

संधिवात तज्ज्ञ डॉ प्रवीण पाटील यांनी रुग्णांच्या केलेल्या पाहणीतून बाब समोर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शरीराची चुकीची ढब, अतिकष्टांमुळे येणारा थकवा किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे जडलेली पाठदुखी म्हणून बरेचदा दुर्लक्षित केले जाणारे दुखणे हे प्रत्यक्षात शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या अभावामुळे उद्भवणारी एक स्थिती म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) असू शकते, जी अवघ्या विशी आणि तिशीत गाठू शकते आणि कायमच्या अपंगत्वास कारणीभूत ठरू शकते असा इशारा प्रसिद्ध संधिवात तज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील यांनी दिला आहे.

अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) हा संधीवाचाच एक प्रकार आहे. जो रक्तातील संधीवाताच्या प्रकारात मोडतो.

जो १५ ते ४० वयोगटाच्या आतील तरुणांना होतो. डॉ पाटील यांनी पुण्यातील या वयोगटातील १०० रुग्णांची पाहाणी केली. त्यामध्ये एएसच्या जवळ-जवळ ७० टक्‍के रुग्णांमध्ये आजाराच्या सुरुवातीच्या ३ वर्षांमध्ये किंवा त्याहून अधिक काळ आजाराचे योग्य निदान होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

संधीवाततज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील म्हणाले, शंभरातील जवळ-जवळ एक व्यक्ती मणक्याच्या इन्फ्लेमेटरी आर्थ्ररायटीसने ग्रस्त आहे. या स्थितीमध्ये मणक्याची हाडे एकमेकांशी जोडली जातात व मणका ताठर होतो. यामुळे पाठीला कायमचा पोक येतो. साधारणपणे १४-४० वर्षे वयोगटामध्ये जडणारा व पुरुषांच्या उत्पादक वर्षांची मोठी हानी करणारा हा आजार घरगुती उपचार करून किंवा दुकानात मिळणारी औषधे घेऊन बरा करण्याचा प्रयत्न रुग्णांकडून बरेचदा केला जातो. या आजारात सायटिका वगैरेसारखे चुकीचे निदान देखील केली जाते. निदान आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे उत्पादकता कमी होणे, कामावरील गैरहजेरी वाढत असल्याचे व त्यामुळे ८ टक्के तरुणांना नोकरीही गमवावी लागल्याचे दिसले.

......

अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) लक्षणे

* पाठीचे दुखणे

* आराम केल्यावर त्रास होणे. विशेषतः रात्री आणि सकाळी वेदना होणे

* एका जागी बसल्यावर त्रास होणे.