पुणे : दुकानात बोलावून दोघांशी ओळख करून देत असताना कशाला ओळख करून देतो, असे बोलल्याने टोळक्याने एकाला मारहाण करून लोखंडी रॉड, बांबूने घरात तोडफोड केली.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. सचिन शिंदे (वय २१), नितीन जमादार (३२), अमित प्रसाद (३२), रोहित काळे (२७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी विठ्ठल निवृत्ती कुरपे (४७, रा. सरगम सोसायटी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी सचिन शिंदे याने त्याच्या ट्रिक शॉप या दुकानात शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास बोलावले. त्यावेळी दुकानात नितीन जमादार व अन्य दोघे होते. सचिन शिंदे हा इतरांची ओळख करून देत होता. त्यावेळी कुरपे माझ्याशी कशाला ओळख करून देतो, असे बोलले. त्यावरून राग आल्याने त्यांनी लोखंडी रॉड, बांबूने फिर्यादीच्या घराच्या अंगणात तोडफोड केली. दुचाकीची हेड लाईट काच फोडून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक होळकर तपास करीत आहेत.