मनोज सर्जेराव म्हस्के (वय ३०, रा. हरिश्चंद्री, ता. भोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेची खबर मयताचे भाऊ गणेश याने किकवी पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. २८) रात्रीच्या वेळी घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
किकवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २७) रोजी रात्री आठच्या सुमारास मनोज घरी आला होता. कुटुंबासमवेत जेवण करून गुरांच्या गोठ्यात झोपण्यासाठी गेला होता. सकाळी उठल्यानंतर वडील सर्जेराव यांना मनोज याने गोठ्यातील लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला असल्याचे दिसले. यानंतर पो. उपनिरीक्षक राहुल साबळे, हवालदार जगदीश शिरसाट, योगेश राजीवडे, नाना मदने हे घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपास हवालदार जगदीश शिरसाट करत आहेत.