काशिफचे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे दुकान नाही. केवळ आपली मित्रमंडळी येथे व्यवसाय करतात आणि आपण जवळच राहतो म्हणून एक सामाजिक कर्तव्य म्हणून कोणीही आत जाण्यासाठी तयार नसताना धाडस करीत जेवढं समान काढता येईल, तेवढं सामान त्याने बाहेर काढले. स्वतः सुरुवात केली, त्यानंतर त्याच्या मदतीला इतर धावून आले. त्यामुळे थोडं काही सामान वाचू शकलं. सामान काढल्यानंतर काशिफ पोलीस व फायर ब्रिगेड प्रशासनालाही सकाळी ६ वाजेपर्यंत मदत करीत होता. हे करत असताना त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणत आगीच्या वाफा लागल्या आणि डोक्यावरचे केसही जळाले.
याविषयी कशिफ चौधरी म्हणाले की घटना खूप वाईट आहे. यामुळे अनेक तरुण आज रस्त्यावर आले आहेत. मी स्वतः त्या रात्री फायर ब्रिगेडला फोन केला होता. परंतु, ते ३० ते ४० मिनिटं उशिरा आले, खरं तर त्यांना संचारबंदी असताना आणि रात्री ११ नंतर यायला ५ मिनिटं पुरेशी होती, जर ते वेळेत आले असते, तर काही दुकाने वाचली असती.