पुणे: किल्ले सिंहगडावर न्यूझीलंडवरून आलेल्या पर्यटकाबरोबर काही तरुणांनी गैरव्यवहार केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला होता. चार तरुणांनी न्यूझिलंडच्या पर्यटकांशी गप्पा मारल्या व त्याला मराठी येत नसल्याचे समजल्यावर त्याला मराठीतील गलिच्छ व अश्लिल शिव्या म्हणायला लावल्या. मराठी भाषा अजिबात माहित नसल्याने परदेशी पर्यटकाने त्या शिव्या म्हटल्या. त्यावरून हवेली पोलिस ठाण्यामध्ये पोलिस हवालदार संतोष भापकर यांनी चौघांविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार व्हिडीओमधील चार तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या तरुणांचे डोके ठिकाणावर आले असून त्यापैकी एकाने माफीही मागितल्याची माहिती समोर येत आहे.
माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. मला भानच राहिलं नाही मी गड किल्ल्यावर आहे. आणि नादानीमध्ये मित्रा मित्रांमध्ये घाण शिव्या दिल्या, नादानीमध्ये खूप मोठी चुकी झाली. प्लिज मला माफ करा असे म्हणत त्या मुलाने व्हिडीओ करून माफी मागितली आहे. ३ एप्रील रोजी न्यूझीलंड येथील एक पर्यटक सिंहगडावर ट्रेकसाठी गेला होता. त्यावेळी संभाजीनगर येथील आठ ते दहा तरुणांचा ग्रूपही ट्रेक करत होता. ट्रकेदरम्यान दत्तात्रल नाईलकर यांचा लिंबू सरबतचे स्टॉल आहे तेथे हे तरुण थांबले होते. त्यातील चार तरुणांनी न्यूझिलंडच्या पर्यटकांशी गप्पा मारल्या व त्याला मराठी येत नसल्याचे समजल्यावर त्याला मराठीतील गलिच्छ व अश्लिल शिव्या म्हणायला लावल्या. मराठी भाषा अजिबात माहित नसल्याने परदेशी पर्यटकाने त्या शिव्या म्हटल्या. या न्युझीलँड युट्युबर ल्युकेथ नामक व्यक्तीचा व्हिडिओ वायरल झाला. तो सिंहगड परिसरात फिरण्यासाठी आला असतात त्याबाबतच एक व्हिडिओ त्याने अपलोड केला. त्यांनतर या तीन ते चार तरुणाविरोधात पुणे ग्रामीण मधील हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.