नेरे : नीरा-देवघर धरण (ता.भोर) परिसरात शुक्रवारी (दि. २६) शिंदेवाडी (ता. खंडाळा) मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. भोर येथील चार तरुणांनी पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान बाहेर काढला. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज महेंद्रनाथ शर्मा (मूळ रा. तीनसुखिया ता. जिल्हा तीनसुखिया, आसाम) असे बुडालेला युवकाचे नाव आहे. त्याचे पाच मित्र २६ जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशी नीरा-देवघर धरणावर फिरायला गेले होते. सर्वजण मद्यपान व पार्टी करून संध्याकाळी पाचच्या दरम्यान धरणात पोहण्यास उतरले असता पोहताना मनोज शर्मा यास दम लागून बुडून मृत्यू झाला, अशी फिर्याद भोर पोलिसात रणजीता रामेश्वर दास (रा. शिंदेवाडी) याने दिली. मनोजचा मृतदेह शनिवारी एकच्या दरम्यान भोर पोलीस व स्थानिक महेंद्र सागळे, सुनील पवार, जनार्धन सागळे, जगन शिर्के या तरुणांनी बाहेर काढला. पुढील तपास भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग सुतार व नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वनाथ जाधव व प्रदीप नांदे करीत आहेत.
मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा नीरा-देवघर धरणात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 7:08 PM
नीरा-देवघर धरण (ता.भोर) परिसरात शुक्रवारी (दि. २६) शिंदेवाडी (ता. खंडाळा) मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.
ठळक मुद्देभोर येथील चार तरुणांनी पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह काढला बाहेर२६ जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशी नीरा-देवघर धरणावर गेले होते फिरायला