लहू वाघमारे हा त्याच्या भावासह गाडेवाडी येथील खाणीच्या कठड्यावर बसून खाणीच्या पाण्यामध्ये दुपारच्या वेळेस मासेमारी करीत होता.तेव्हा मासेमारी करीत असताना त्याला उन्हामुळे फिट आली असल्याचा अंदाज त्याच्या भावाने व्यक्त केला. त्या फिटेच्या झटक्यामध्येच त्याचा तोल गेला आणि तो खाणीत पडला. पडताना तो एका दगडावरती पडल्यामुळे त्याला जखम झाली आणि तो नंतर पाण्यात बुडाला, त्याला पोहण्यास येत होते मात्र त्याला मार लागल्यामुळे त्याची शुध्द हरपली व तो बुडाला.
मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या टीमला पाचारण करण्यात आले तेव्हा मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने शनिवारी सकाली साडेसात वाजण्याच्या सुमारास येत या युवकाच्या शोधमोहिमेला सुरुवात केली, तेव्हा या टीमने जवळपास दोन ते तीन तास शोध मोहीम राबवून या युवकाचा मृतदेह शोधून काढला. तेव्हा तो मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून त्याचा पंचनामा करून पुढील कार्यासाठी तो ससून रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला.