लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून २५० तरुण, तरुणींची नेमणूक करण्यात आली आहे. याप्रसंगी येेेथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. या वेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ पुणे शहर नम्रता पाटील पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर कल्याणराव विधाते सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक जे. डी. हंचाटे, निकेतन निंबाळकर, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर (लोणी काळभोर), प्रियांका भिसे (कदमवाकवस्ती), रेश्मा कांबळे (थेऊर), मिलिंद कुंजीर (कुंजीरवाडी), कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड उपस्थित होते.
लोणी काळभोर, उरुळी कांचन, उरुळी देवाची येथील एकूण २५० युवक, युवती हे विशेष पोलीस अधिकारी म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्यास मदत करणार आहेत. देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असून महाराष्ट्रात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलावर प्रचंड ताण आला आहे. पोलिसांना अहोरात्र काम करावे लागत आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या विशेष पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये यांची मोठी मदत होणार आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, उरुळी देवाची, येथील युवक, युवती स्वेच्छेने विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करणार आहेत. सदर कार्यक्रमास २०० विशेष पोलीस अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी हजर होते. कार्यक्रमाचे वेळी सोशल डिस्टंन्सिंग व कोविड संदर्भातील सर्व नियमाचे पालन करण्यात आले. सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले.
मार्गदर्शक करताना अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, नामदेव चव्हाण.
२५० युवक, युवती हे विशेष पोलीस अधिकारी म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्यास मदत करणार आहेत.