शिरूर येथे तरुणांना मार्गदर्शन करताना सद्गुरुमनोहरमामा महाराज भोसले बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, युवक कार्यकर्ते गणेश पाचर्णे, विशाल गायकवाड, कांतीलाल भोसले, सतीश पाचंगे, संतोष कोठारी, हरीश झंजाड, धिरज पठारे, विनायक पाचर्णे, दादाभाऊ पाचर्णे, अमोल पवार, भाऊसाहेब सरड आदी उपस्थित होते.
सद्गुरू मनोहरमामा महाराज म्हणाले की, महाराष्ट्र ही थोर साधु संताची भूमी असून तरुणांनी अध्यात्माचे ज्ञान आत्मसात केल्यास व्यसन व वाईट संगती पासून दुर राहात सुखी जीवनाचा मार्ग नक्कीच सापडतो.
दादाभाऊ वाखारे म्हणाले की, भरकटत चाललेल्या तरुणांना मनोहरमामा महाराज यांसारख्या थोर लोंकाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. यामधूनच खऱ्या अर्थाने समाज सुधारणेचे कार्य घडणार आहे. उपस्थितांचे स्वागत विशाल गायकवाड यांनी तर आभार गणेश पाचर्णे यांनी मानले.
१३ टाकळी हाजी
युवकांची संवाद साधताना सद्गुरू मनोहरमामा महाराज.