श्री गणेश कला क्रीडा मंच येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने पानिपतनंतरचा मराठ्यांचा २५० वा विजय दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात त्या बोलत होते.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, प्रदीप रावत, तुकोजी होळकर यांचे वंशज भूषण होळकर, इतिहासतज्ज्ञ उदय कुलकर्णी, डॉ. अतुल बिनीवाले आदी उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबरोबरच तुकोजी होळकर, महादजी शिंदे, माधवराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिंदे म्हणाल्या,
छत्रपती शिवाजी, संभाजी आणि राजाराम महाराजांनी मोगल साम्राज्याचा ढाचा नष्ट करून हिंदवी स्वराज्य स्थापनेचा पाया रचला. त्यानंतर मराठा साम्राज्यात बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर यांनी मोघल आणि इंग्रजांविरुद्धही लढा दिला. त्यामुळे भारताच्या सीमाही वाढल्या. मराठेशाहीचे कर्तृत्व प्रत्येक तरुणाने वाचायला, ऐकायला हवे. राष्ट्रनिर्माणमध्ये सहभागी व्हावे.
....................
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरोधात लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या पाठोपाठ संभाजी महाराज नऊ वर्ष स्वराज्यासाठी लढले. तर राजाराम महाराजांनी ११ वर्षे संघर्ष केला.
या सर्वांचे कर्तृत्व आपल्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यानंतर बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर या मराठ्यांनी दिल्ली जिंकण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. पानिपत युद्धानंतर १० वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी दिल्ली जिंकली. याचे स्मरण करून नव्या पिढीने देशभक्तीची प्रेरणा घ्यावी. या उद्देशाने २५० वा दिल्ली विजय दिन साजरा केला जातो.
- पांडुरंग बलकवडे
.............
देशातील तरुण आधुनिकतेच्या माध्यमातून जगभरात कर्तृत्व गाजवत आहेत. अनेक प्रसिध्द कंपन्याचे सीईओ भारतीय आहेत. चीन आणि पाकिस्तानसारखे शत्रू भारत तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोर्नोग्राफीच्या जाळ्यात अडकवत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे भारताला लक्ष्य केले जात आहे. अशा वेळी तरुणांनी जागृत राहणे गरजेचे आहे. त्यांना तोंड देण्यासाठी सशस्त्र सेना नेहमीच सज्ज राहणार आहे.
भूषण गोखले