पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना मदत करण्यासाठी पुण्यातील मुकुल-माधव फाउंडेशने पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे ज्यांचे उत्पन्न बंद झाले अशा कुटुंबासाठी त्यांनी जीवनावश्यक वस्तू पुरवण्यास सुरुवात केली आहे. या कामाला सुरुवात झाली असून अवघ्या 24 तासात तब्बल 6 हजार लोकांसाठीचा मदत निधी जमा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अनेक गरीब कुटुंब अडचणीत आली आहेत. दररोज कमावून गुजराण करणाऱ्या या कुटुंबांकडे अन्न, धान्याचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा कमी होत जात आहे. यापुढेही काही दिवस त्यांना काम मिळणार नसल्याने त्यांना मदतीची गरज आहे. हीच मदत ओळखून त्यांना मदत करण्यास मुकूल माधव फाउंडेशन पुढे सरसावले आहे. त्यासाठी एक विशेष कीट बनवण्यात आले आहे. यामध्ये एका कुटुंबाला 14 दिवस पुरेल इतक्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यातून साधारण 24 तासात 12 लाख रुपयांचा मदत निधी गोळा झाला आहे.
याबाबत मुकूलमाधव फाउंडेशनच्या ट्रस्टी गायत्री छाब्रिया म्हणाल्या की, 'बाहेर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने अनेक व्यक्तींना काम मिळणे बंद झाले आहे. अनेक घरांमधील किराणाही संपत चालला आहे. हीच गरज ओळखून या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी आमचे स्वयंसेवक स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन घरोघरी जात आहेत. त्यावेळी ते गरजू कुटुंब शोधून त्यांना मदत करत आहे. या कामात कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर ते ketto.org वर जाणून मदत करू शकतात. एका कुटुंबाच्या किटसाठी केवळ १००० रुपये खर्च येणार असून त्यातून एक संपूर्ण कुटुंब 14 दिवस काढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
असे चालणार काम
-एका किटसाठी 1000 रुपये इतका खर्च
- किटमध्ये गहू, तांदूळ, तेल यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचा समावेश
- कुटुंबातील 5 व्यक्तींना 14 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक साहित्याचा समावे