पुणे : जीवनात चांगले कर्म करा, दुसऱ्यांना मदतीचा हात द्या, ध्यान व दान करा. जाताना संपत्ती आणि शरीर आपण येथेच ठेवून जाणार आहोत, असे प्रतिपादन ध्यानयोगी आचार्य प.पू.श्री शिवमुनींजी म.सा यांनी वाघोली येथे जैन स्थानकांच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये केले. पुणे शहरात चातुमार्सासाठी त्याचे आगमन होत आहे.प.पू. आचार्य,युवाचार्य श्री महेंद्रऋषीजी म.सा. आदी ठाणा यांनी आज दिनांक २६ रोजी लोणीकंद ते वाघोली विहार केला. येताना त्यांनी बी,जे,एस.च्या केंद्राला देखील सदिच्छा भेट दिली. यावेळी पुणे चातुर्मास समिती सदस्य, वाघोली संघातील सदस्य, युवा कार्यकर्ते महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज दिनांक २७ रोजी सकाळी ९ वाजता चंदननगर येथे सकल जैन समाज पुणेच्या वतीने त्यांचे पुणे शहर प्रवेशासाठी भव्य स्वागत होणार आहे. पुण्याच्या महापौर, आमदार, खासदार, नगरसेवक, जैन समाजातील सर्व संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित असणार आहेत. ध्यानयोगी आचार्य प.पू.श्री शिवमुनींजी म.सा यांचे २४ वषार्नंतर प्रथमच पुण्यात आगमन होत आहे. येत्या ११ जुलै रोजी त्यांचा मार्केटयार्ड येथून वर्धमान सांस्कृतिक कार्यालय येथे चातुर्मास प्रवेश होणार आहे. आज वाघोली येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. उपाध्याय प्रवर रवींद्रमुनींजी म.सा., सलहाकार प.पू. रमणिकमुनीजी म.सा, प.पू. ज्ञानप्रभाजी (सरल) म.सा, उपप्रवर्तीनी प.पू. रिद्धीमाजी म.सा,यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.या विहार मध्ये व कार्यक्रमाला आमदार बाबुराव पाचर्णे, सरपंच वसुंधरा उबाळे, पुणे चातुर्मास समितीचे कार्याध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, विजय भंडारी,राजेश सांकला, विलास राठोड, बाळासाहेब धोका, रमेशलाल गुगळे, माणिक दुगड, रमणलाल लुंकड, किरण बोरा, ओमप्रकाश रांका,प्रमोद दुगड,कीतीर्राज दुगड, अविनाश चोरडिया, सागर सांकला, आदेश खिंवसरा, अनिल नहार, सुदेश भंन्साळी, प्रफुल कोठारी, विजय छाजेड, महावीर नहार, अविनाश कोठारी, चंद्रकांत पगरिया, लालचंद नहार, शांतीलाल बोरा, डॉ सुभाष लुंकड, रामदास दाभाडे, शिवदास उबाळे, सर्जेराव वाघमारे उपस्थित होते. यावेळी जैन स्थानक उभारणीसाठी अनेकांनी आर्थिक मदतीचा हात दिला. चार हजार चौरस फूट जागेत हे स्थानक लवकरच उभे राहणार आहे. अध्यक्ष चंद्रशेखर लुंकड व संदीप चोरडिया यांनी स्वागत केले. मनोज कांकरिया यांनी प्रास्ताविक केले. संगीतकार तरुण मोदी यांनी सूत्र संचालन केले. महेंद्र पगरिया, प्रशांत बोरा, दीपक कर्णावट, अतुल चोरडिया, हेमंत लुणावत, डॉ देवेंद्र नहार, स्वप्नील शेटीया निलेश शेटीया, राहुल शेटीया, गिरीश शहा यांनी परिश्रम घेतले. श्री जैन श्रावक संघ व नवकार प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दान व ध्यानामध्ये आपले मन रमवा : आचार्य शिवमुनीजी म.सा.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:52 PM
ध्यानयोगी आचार्य प.पू.श्री शिवमुनींजी म.सा यांचे २४ वषार्नंतर प्रथमच पुण्यात आगमन होत आहे.
ठळक मुद्देवाघोली जैन स्थांनकाचे भूमिपूजन उत्साहात, चंदननगरमध्ये पुणे शहर प्रवेश