धायरी : सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल व २ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याप्रकरणी प्रशांत उर्फ बाळा सुरेश कांबळे ( वय २४ वर्षे धंदा नौकरी रा. बाबु भंडारी चौक, आनंदनगर, चिंचवड, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेप्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, नवले पुलाजवळ एक तरुण पिस्तुल घेऊन थांबला आहे. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन संशयितरित्या थांबलेल्या तरुणाची चौकशी केली असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ४० हजार रुपये किंमतीचे पिस्तुल सहाशे रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुसे असा एकुण ४० हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कांबळे हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुन व खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड येथे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, अमेय रसाळ, किशोर शिंदे, देवा चव्हाण ,सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, विकास बांदल यांच्या पथकाने केली.