कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळामध्ये अनेक कष्टकरी लोकांची कामे बंद झाल्याने रस्ते, पदपथ, झोपडपट्टीत राहणारे, बसस्थानकात मुक्कामी राहणाऱ्या व हातावर पोट असलेल्यांचे दोन वेळच्या जेवणासाठी प्रचंड हाल झाले. हे दृश्य पाहून बारामती शहरातील दानशूर तरुण एकत्रित आले आणि त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रोजच्या जेवणात २०० लोकांना राईस, भाजी, चपाती देऊन मदतीचा हात बारामतीतील आमराई भागातील दिनेश सोनवणे, यशवंत अवघडे, शुभम भिसे, विजय मोरे, संतोष जगताप, चंद्रकांत सावंत, जालिंदर उघडे अशी या अन्नदान करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना जेवणाची पाकिटे वाटत आहेत. त्यांच्या समाजसेवेचे सगळीकडे कौतुक होतं आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन तरुणांचे कौतुक केले आहे.
अन्नदानाचे कार्य करताना बारामतीतील तरुण
३१०५२०२१-बारामती-०१