VIDEO | पुण्यात युवक काँग्रेसकडून पेट्रोल पंपावर भोंगे लावून महागाईचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 08:32 PM2022-04-19T20:32:57+5:302022-04-19T20:38:07+5:30
पुणे : वडगाव शेरी (पुणे) येथे पेट्रोल पंपावर भोंगा लावून पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ...
पुणे : वडगाव शेरी (पुणे) येथे पेट्रोल पंपावर भोंगा लावून पेट्रोलडिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेसकडून करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढ होणार नाही या विषयावर केलेले भाषण व 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणं भोंग्यावर लावण्यात आले.
पुण्यात युवक काँग्रेसकडून पेट्रोल पंपावर भोंगे लावून महागाईचा निषेध#pune#congresspic.twitter.com/O2wKr44sAp
— Lokmat (@lokmat) April 19, 2022
महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकेत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संकेत गलांडे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात भोंग्या संदर्भात राजकारण सुरू आहे, काही पक्ष मूळ मुद्द्यांना बगल देत जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसतर्फे आम्ही पेट्रोल डिझेल दरवाढीचा ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पेट्रोल पंपावर भोंगे लावून आंदोलन करत आहोत.
यावेळी क्या हुआ तेरा वादा गाण व नरेंद्र मोदींनी केलेले पेट्रोल, डिझेल संदर्भातील भाषणे लावण्यात आली होती." आंदोलनावेळी काँग्रेसचे रमेश सकट, अरुण वाघमारे, सुनील मलके ,संतोष आरडे, भुजंग लव्हे, सादिक शेख,बाबा नायडू, रमाकांत साठे, युसुफ मलिक, महेंद्र बाबर, नितीन काळे, सचिन भोसले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.