पिरंगुट (पुणे) : सातव्या मजल्यावरून पडून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील पिरंगुट जवळ घडली. अमित महालिंग आवाळे (वय ३७. रा. अर्बनग्राम सोसायटी, एच विंग, पिरंगुट) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमित हे पत्नी, मुलगा व मुलगी असे कुटुंबासह अर्बनग्राम सोसायटीत राहत होते. ते भरे येथील एक खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्याशिवाय ते घोटावडे फाटा परिसरात घरोघरी वृत्तपत्रे वितरणाचे देखील काम करीत होते. आज अचानक ते सातव्या मजल्यावरून खाली पडले. मात्र ते कसे पडले याबाबत कोणतीच माहिती अद्याप पोलिसांना व परिसरातील लोकांना माहिती झाली नाही.
खाली पडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पौड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.