शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डंपरखाली सापडून तरुणाचा मृत्यू, शिवाजी रोडवरील घटना

By विवेक भुसे | Published: January 09, 2024 11:27 PM

शिवाजी रोडवरील रामेश्वर चौकात मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

पुणे : डंपरला ओलाडून पुढे जात असताना अचानक नो एंट्रीमध्ये विरुद्ध बाजूने दुचाकीस्वार आल्याने डंपरचे चाक डोक्यावरुन गेल्याने एका मोटारसायकलस्चाराचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी रोडवरील रामेश्वर चौकात मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

शुभम दादाभाऊ डोके (वय २१, रा. मगरपट्टा) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी डंपरचालक कलमदेव कैलाश महतो (वय २८, रा. मुंढवा) याला अटक केली आहे. स्कुटरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम डोके हा शिक्षण घेत आहे. तो दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन शिवाजी रोडने मोटारसायकलवरुन स्वारगेटच्या दिशेने जात होता. रामेश्वर चौकाजवळ त्याने उजव्या बाजूने डंपरला ओलांडून पुढे जात असताना मंडईकडून एक स्कूटरचालकाने अचानक वाहतूकीच्या विरुद्ध दिशेने गाडी वळवली. तो डोके यांच्यासमोर आला. त्यामुळे डोके बिचकले. 

त्याचा तोल जाऊन डाव्या बाजूने जाणार्या डंपरच्या उजव्या चाकाच्या बाजूला गाडीसह पडला. डंपरचे मागचे चाक त्याच्या डोक्यावर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे तपास करीत आहेत. नो एंट्रीतून अनेक जण बेधडकपणे जात असतात, परंतु एकाच्या चुकीमुळे तरुणाला आपला जीव गमविण्याची वेळ आज आली.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे