पुणे : एटीएममधून पैसे निघत नसल्याने मदतीच्या बहाण्याने एका २० ते २५ वर्षाच्या युवकाने तिघांना फसवूण तब्बल ४१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी १९ वर्षांच्या युवकाने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली. हा युवक लोणी काळभोर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये २१ एप्रिल रोजी पैसे काढण्यासाठी गेला होता. पैसे निघत नसल्याने या युवकाला पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने फिर्यादीचा पासवर्ड पाहून १२ हजार रुपये काढून फसवणूक केली. त्याच दिवशी एक महिला याच एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली असताना त्यांच्या खात्यातून ९ हजार रुपये फसवणूक करून काढून घेतले. कुंजीरवाडी येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएममधून २० जूनला एकाच्या खात्यातून २० हजार रुपये काढून फसवणूक केली. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हडपसर येथील सातवनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये डेबिट कार्डचा पिन बदलण्यासाठी एका ३५ वर्षाच्या गृहस्थाने एका तरुणाला कार्ड दिले असताना त्याने फिर्यादीचे कार्ड बदली करून त्यांच्या खात्यातून १४ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केली.