सध्याच्या काळात प्रदूषण आणि कोरोनामुळे श्वसनक्रियेवर परिणाम झाला आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम फुप्फुसांवरही होतो. योगामध्ये असे अनेक प्रकार आहेत ज्यामुळे आपण आपली श्वसनक्रिया मजबूत बनवण्यात यशस्वी होऊ शकतो. प्राणायाममध्येही असे काही विशेष गुणधर्म असतात जे आपल्या श्वसनक्रियेला अगदी सहजरित्या सुरू ठेवून श्वसनाशी संबंधित कोणतेही आजार बरे करण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक योगासने करताना श्वसनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्ही प्राणायाम करणे उचित ठरू शकते.
नदीच्या परिसरात भरपूर ताजी हवा आणि शांत असे वातावरण असते. या हवेत सकाळच्या वेळी भरपूर प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असतो. जर आपण सकाळच्या वेळी नदीच्या जवळ योगासने करत असाल तर आपल्या शरीराला जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो व आपले शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते. पाण्यातील योगासनांमुळे आपल्या शारीरिक क्षमतेचा चांगला कस लागतो आणि आपला शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते.
याबाबत बाळासाहेब सरोदे यांनी योगाचे महत्त्व तरुणांना पटवून देण्यासाठी गावोगाव शिबिरे घेत असून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात योग शिक्षणाकडे आकर्षित होत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक परिसरातून होत आहे. माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, सरोदे यांच्यामुळे योग शिक्षण ही चळवळ उभी राहत असून तरुण सदृढ होण्यास मदत होईल.
०८ टाकळी हाजी योगा