इंदापूर : निमगाव केतकीच्या उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या दक्षिणेला साधारणत: चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निमगाव केतकी गावच्या हद्दीतील राऊतवाडीमधील निमगाव केतकी बिजवडी रस्त्यावर ननवरे नावाच्या शेतकऱ्याच्या शेताजवळ मनोहर विठ्ठल म्हस्के (वय अंदाजे ३८ वर्षे, रा. भरणेवाडी, अंथुर्णे, ता. इंदापूर) या युवकाची हत्या झाल्याचे सोमवार (दि. १२) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सजन हंकारे, फौजदार सुशांत किनगे, अमोल ननावरे, दिनेश कुलकर्णी, हवालदार शंकरराव वाघमारे, अंकुश खोमणे, पोलीस कर्मचारी अमीत यादव, जगदीश चौधर, बापू मोहिते, अमित चव्हाण, महेश माने आदींचे पथक घटनास्थळी पोहोचले.म्हस्के याने या भागात नव्यानेच जमिन घेतली आहे. त्यावर डाळिंबाची बाग आहे. आणखी शेत जमीन घेण्याच्या दृष्टीने त्याची बोलणी चालली होती. उद्या सौदा होणार होता. मेव्हण्याच्या लग्नाच्या निमित्ताने म्हस्के हा तीन दिवसांपासून सासरवाडीला होता. नवविवाहित जोडप्याबरोबर तो ही सहकुटुंब देवदर्शनासाठी जावून आला होता. रविवारी रात्री दुचाकीवरुन डाळिंबाच्या शेताकडे जाताना रस्त्यावरच दुचाकीवर असताना त्याच्यावर हल्ला झाला. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर प्राणघातक घाव आहेत. झटापटीत सदऱ्याचे बटण तुटले आहे. सामानाची पिशवी दुचाकीच्या हँडलला आहे. विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर सकाळी नऊ वाजता घटना स्थळावर आले आहेत. फिर्याद नोंदवण्याचे काम सुरु आहे.
इंदापुरातील निमगाव केतकी परिसरात युवकाची हत्या; कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 2:12 PM
राऊतवाडीमधील निमगाव केतकी बिजवडी रस्त्यावर मनोहर विठ्ठल म्हस्के (वय अंदाजे ३८ वर्षे, रा. भरणेवाडी, अंथुर्णे, ता. इंदापूर) या युवकाची हत्या झाल्याचे सोमवार (दि. १२) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले.
ठळक मुद्देनिमगाव केतकी बिजवडी रस्त्यावर मनोहर विठ्ठल म्हस्के या युवकाची हत्याशेत जमीन घेण्याच्या दृष्टीने त्याची चालू होती बोलणी