शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटकेसाठी पन्हाळगडाकडून पावनखिंडी मार्गे विशाळगडाकडे या डोंगरदऱ्यातील अंतर मावळ्यांच्या साहय्याने पार केले होते. त्याच मार्गाने युवक दोन दिवस ट्रेकिंग करत होते. या मोहिमेमध्ये समीर बोत्रे,प्रकाश गोलांडे,रामदास काळभोर
सुभाष शेलार ,बाजीराव चोरमले,अस्लम शेख,गणेश शेळके
दादासाहेब वाघचौरे या पारगाव पंचक्रोशीमधील व्यावसायीक युवक सहभागी झाले. ट्रेकिंग दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घनदाट जंगल, अरुंद रस्ता ,पायवाट यातून वाट काढत युवकांनी ट्रेकिंग केले.
यासंदर्भात ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य रामदास काळभोर म्हणाले की, महिन्यातून एकदा तरी आम्ही ट्रेकिंगला जातोच. आत्तापर्यंत युवकांनी कळसुबाई शिखर ,हरिश्चंद्रगड, अलंग -मलंग- कुलंग, भैरवगड, रतनगड, वासोटा आदी ठिकाणी ट्रेकिंग केले आहे. भविष्यात अधिकाधिक युवकांना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
२१ केडगाव ट्रेक
ट्रेकिंग मध्ये सहभागी झालेले सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य