शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

वनस्थली विद्यापीठाला ‘युवास्पंदन’चे विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 2:17 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवात राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवात राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) विद्यापीठाच्या संघाने उपविजेतेपद मिळविले आहे. तसेच स्पर्धेतील पाचही कलाप्रकारांमध्ये याच दोन विद्यापीठांच्या विद्यार्थिनींनी पारितोषिकांवर आपली मोहर उमटवली आहे.विद्यापीठ परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या युवास्पंदन या युवक महोत्सवाचे पुरस्कार वितरण ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. डॉ. सतीश आळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भारतीय विद्यापीठ संघाचे प्रतिनिधी डॉ. सुरिंदर मोहन कांत, प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी डॉ. अतुल पाटणकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महोत्सवाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. विलास उगले, डॉ. महेश अबाळे, अधिसभा सदस्या बागेश्री मंठाळकर, आयोजन समितीचे सचिव व विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. मोहन वामन आदी यावेळी उपस्थित होते.डॉ. आळेकर म्हणाले, की महाविद्यालयीन जीवन हे आपला छंद आवडीपुरताच मर्यादित ठेवायचा, की प्रोफेशन म्हणूनही तो स्वीकारायचा हे ठरविण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरतो. जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात ज्यावेळी आपल्याला छंद की प्रोफेशन यापैकी एका गोष्टीची निवड करावी लागते. त्यामुळे असे महोत्सव आपल्याला आपला आतला आवाज ओळखण्यासाठीची संधी देतात. त्यावेळी विद्यार्थ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. कांत यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. तसेच कुलगुरू डॉ. करमळकर आणि संपूर्ण आयोजन समितीचे अभिनंदन केले.राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रभाकर देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.विद्यापीठाला युवास्पंदनमध्ये काय?४सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना युवास्पंदन महोत्स्वात भारतीय सुगम गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक, शास्त्रीय तालवाद्यवादन स्पर्धेत प्रथम क्रमांक, एकल शास्त्रीय गीतगायनमध्ये प्रथम क्रमांक, लोकनृत्यमध्ये प्रथम, स्किटमध्ये द्वितीय, शिल्पकलेत तृतीय, शोभायात्रेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे पुरस्कारकुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, की विद्यापीठातर्फे यापुढे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाच्या स्थापनादिनी विशेष पुरस्कार दिले जातील. हे पुरस्कार विद्यापीठाच्या जीवनसाधनगौरव पुरस्काराप्रमाणेच असतील. तसेच विद्यापीठामध्ये ‘फाईन आटर््स अँड डिझायनिंग स्कूल’ व ‘लिबरल आटर््स स्कूल’ उभारण्यात येईल, असेही करमळकर यांनी जाहीर केले.‘युवास्पंदन’ महोत्सवातील विजेते संघसर्वसाधारण विजेतेपद : वनस्थली विद्यापीठ, राजस्थान.महोत्सवाचे उपविजेतेपद : एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई .ललितकला विभाग विजेतेपद : एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई .नाट्यकला विभाग विजेतेपद : वनस्थली विद्यापीठ, राजस्थानसाहित्य विभाग विजेतेपद : वनस्थली विद्यापीठ, राजस्थाननृत्यकला विभाग विजेतेपद : एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई .संगीतकला विभाग विजेतेपद : वनस्थली विद्यापीठ, राजस्थान.

टॅग्स :universityविद्यापीठPuneपुणे