पुणे : तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूने वार करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी सकाळी स्वारगेट कालव्यामध्ये हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.संभाजी दादाराव ओहाळ (वय ३५ ते ४०, रा. लातूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहाळ हे मूळ लातूरचे रहिवासी आहेत. तीन ते चार आठवड्यांपूर्वी ते मुंबईमध्ये गेले होते. तेथून ते पुण्यात आले होते. दांडेकर पूल परिसरात त्यांचे नातेवाईक राहायला आहेत. त्यांच्याकडे ते जाऊन येऊन राहत असत.साधारणपणे दोन दिवसांपूर्वी ते गायब झाले होते. रविवारी सकाळी स्वारगेट जवळील कालव्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. (प्रतिनिधी)
तरुणाचा खून करून मृतदेह टाकला कालव्यात
By admin | Published: April 13, 2015 6:22 AM