तळेगाव ढमढेरे (पुणे) : येथे धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या युवकाला ताब्यात घेत शिक्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली. उमर रौप शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तळेगाव ढमढेरे येथील एका युवकाने सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील अशी पोस्ट केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार अमोल चव्हाण (रा. शिक्रापूर ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.
शिक्रापूर पोलिसांनी उमर रौप शेख (२३, रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करत आहेत.