पुणे (वाघोली): एकीकडे संपूर्ण देश पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या शोकाकुलात बुडालेला असताना दहशतवादाच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना मात्र, विमाननगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये मात्र सुपरसोनिक फेस्टिवलच्या नावाखाली भरविण्यात आले होते. ह्या पार्टीमध्ये दोन दिवसांपासून दिवसरात्र तरुण-तरुणींचा मद्यधुंद होऊन डीजेच्या तालावर रात्रभर धांगड धिंगाणा सुरू होता. एकीकडे देशाचं रक्षण करताना ४४ जवान शहीद झाले असून त्याबद्दल संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. सांस्कृतिक शहर म्हणून असलेल्या पुणे नगरीमध्ये मात्र सुपरसोनिक फेस्टिवलचा धांगडधिंगाणा मात्र जल्लोषात चालू होता. अखेर या सुपर सोनिक फेस्टिवलला परवानगी दिलीच कशी अशा प्रश्न नागरिक याठिकाणी उपस्थित करत होते. युवासेना ,मनसे ,संभाजी ब्रिगेंड या संघटनांनी अखेर या कार्यक्रमाला विरोध केला. याबाबतीत पोलिसांना रीतसर निवेदन देऊन कार्यक्रम रद्द करण्याची केली मागणी केली. यावेळी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. मात्र पोलीस कार्यक्रम बंद करण्याऐवजी संयोजकांचीच बाजू घेत कार्यकर्त्यांवर दमबाजी करण्याचा पर्यंत केला. कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त वाढवला पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलीस पिंजरा देखील बोलविला. अखेरीस पोलीस अधिकारी शिंदे यांनी कार्यकत्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम अर्ध्या तासासाठी बंद करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्याठिकाणी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .यावेळी सजेर्राव वाघमारे,विशाल सातव.गणेश म्हस्के ,चंद्रशेखर घाडगे,ओंकार तुपे,प्रकाश जमधने,प्रशांत धुमाळ,हितेश बोराडे,शिवाजी पवार,यांच्या सह युवासेना ,मनसे आणि संभाजी ब्रिगेंड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.