पुणे : पुण्यात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचबरोबर प्रदुषणाची पातळीही मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सायकल वापरुन शहरातील प्रदूषण कमी करण्यास हातभार लावावा हा संदेश देण्यााठी पुण्यातील ग्रीनलाईफ फाऊंडेशनतर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मोठ्याप्रमाणावर तरुणांनी सहभाग घेतला. रविवारी बालगंधर्व रंगमंदिरापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरुन जात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिर येथेच या रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रदुषणमुक्त पुणे शहर करण्याच्या उद्देशाने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशनने हाती घेतलेल्या सायकल शेअरिंग याेजनेला नागरकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. त्याचप्रमाणे हा सायकल उपक्रम शहराच्या इतर भागातही राबवावा अशी ग्रीन लाईफची मागणी आहे. या रॅलीमध्ये सहभागी झालेला गणराज ताटे म्हणाला, पुणे शहरातील वाढते प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पाऊल ऊचलणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी जिथे जिथे शक्य आहे तिथे सायकल वापरायला सुरुवात केली पाहिजे. तसेच पुणे महानगरपालिकेने देखील संपूर्ण शहरात सक्षम सायकल मार्ग आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करुन नागरिकांना सायकल व सार्वजनिक वाहतूक सेवा वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. या रॅलीमध्ये राहुल महाजन ,अभिजित लोखंडे, कश्यप पटेल, तेजस मोरे, सोमेश दाहोत्रे, राजेश मोरे, प्रविण कुंभार ,आदित्य बागल , युवराज व्यवहारे, अक्षय पाटील, सौरभ पवार, दत्ता शिनगारे, अभिषेक देशमुख, अमोल पवार, गणराज ताटे आदी तरूणांचा समावेश होता.
सायकल रॅलीतून प्रदूषण कमी करण्याचा तरुणांचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:28 IST
ग्रीन लाईफ या संस्थेच्या तरुणांनी सायकल रॅली काढत प्रदूषण कमी करण्याचा संदेश दिला. जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा अशी अपेक्षाही संस्थेकडून व्यक्त करण्यात आली.
सायकल रॅलीतून प्रदूषण कमी करण्याचा तरुणांचा संदेश
ठळक मुद्देतरुणांनी काढली सायकल रॅलीप्रदूषण कमी करण्याचा दिला संदेश