शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 3:47 PM

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

NCP Yugendra Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पवार कुटुंबातील संघर्ष उफाळून आला होता. या संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता असून तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे. अशातच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यापूर्वी अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हा कुस्तीगीर संघ काम करत होता. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच युगेंद्र पवार यांना या बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

बारामती तालुका कुस्तीगीर संघाबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, "कुस्तीगीर संघाने दादांच्या वाढदिवसानिमित्ताने मैदानी कुस्तीचे आयोजन केलं आहे. मात्र खरे मैदान आम्ही घेतो आणि घेत राहणार. मला बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा माझ्यापर्यंत आली आहे. पण माझ्या वकिलांनी मला सांगितलंय की, तु्म्हाला असं कोणीही अध्यक्षपदावरुन हटवू शकत नाही."

युगेंद्र पवार उतरणार बारामतीच्या आखाड्यात?

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीच्या राजकारणाची दिशा बदलून गेली आहे. बारामतीकरांनी थोरल्या पवारांना कौल दिल्याने येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम बारामतीच्या राजकारणावर होण्याचे संकेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढण्यात विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त युगेंद्र पवार यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. बारामतीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, भावजय शर्मिला पवार, तसेच पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये पवार दाम्पत्याने इंदापूर, तर युगेंद्र यांनी बारामतीत लक्ष घातले. शहरातील प्रत्येक गल्लीत, भागात त्यांनी पायी फिरत प्रचार केला, बारामतीकरांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले. बारामतीच्या विकासात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या असणाऱ्या योगदानाबाबत त्यांनी जाहीर भाषणातून सांगितले. यावरून चुलते अजित पवार आणि त्यांच्यात कलगीतुरादेखील रंगला. बारामती स्थानिक पक्ष कार्यालयाची सूत्रे त्यांनी पहिल्या दिवसापासून हाती घेतली. नवीन पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेत प्रचारात उतरविण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यामुळे आगामी काळात युगेंद्र पवार हे आणखी ताकदीने बारामतीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारyugendra pawarयुगेंद्र पवारbaramati-acबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस