पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात दि. १९ ते २३ डिसेंबर दरम्यान आंतरविद्यापीठीय युवास्पंदन पश्चिम विभाग युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सलग ५ दिवस एकाच वेळी ७ ठिकाणी लोककला, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, समुह गायन, प्रश्नमंजुषा, वादविवाद आदी स्पर्धा पार पडणार आहेत. राजस्थान, गुजराथ, गोवा व महाराष्टÑ या राज्यातील दोन हजार विद्यार्थी आपापल्या संस्कृतींचे प्रतिनिधीत्व या महोत्सवामध्ये करणार आहेत. त्यांच्याकडून सादर केल्या जाणाºया कलांमुळे पुणेकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवाचा मुख्य मंडप हा मुख्य इमारतीजवळील मोकळया मैदानात असणार आहे. त्याचबरोबर नामदेव सभागृह, पुम्बांचे सभागृह, आयुका सभागृह, सेवक विहार, कॉमर्स विभाग हॉल, संत ज्ञानेश्वर सभागृह अशा ७ ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रम होणार आहेत. मुख्य मंडपामध्ये लोककलांचे सादरीकरण होईल. संत नामदेव सभागृहात एकपात्री सादरीकरण, पुम्बां सभागृहात शास्त्रीय संगीत, आयुका सभागृहात शास्त्रीय नृत्य, सेवक विहार येथे रांगोळी व मेहंदी स्पर्धा, कॉमर्स सभागृहात प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा तर ज्ञानेश्वर सभागृहात समुह गायन स्पर्धा होणार आहेत. सकाळी साडे नऊ वाजल्यापासून रात्री उशीरपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस याची माहिती दिली. या महोत्सवासाठी १ कोटी २५ लाख रूपये खर्च येण्याचा अंदाज आहे. उद्योजक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून प्रायोजकत्व, देणगी मिळविण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.कॅम्पसमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्थायुवा महोत्सवासाठी १४० विद्यापीठांमधून २ हजार विद्यार्थी, त्यांचे संघ व्यवस्थापक येणार आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था विद्यापीठ कॅम्पसमध्येच करण्यात येणार आहे. नव्यानेच बांधण्यात आलेले सोशल सायन्स कॉम्पलेक्स, कर्मचारी आवास येथे राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्येष्ठ कलाकरांचा कटटयंदाच्या आंतरविद्यापीठीय महोत्सवामध्ये ज्येष्ठ कलाकरांचा कटट असा एक नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये ज्येष्ठ कलाकारांना आमंत्रित करून त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर प्रसिध्द कलाकारांच्या कलांच्या सादरीकरणाचे कार्यक्रमही या महोत्सवामध्ये असणार आहेत.
............
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या १९ ते २३ डिसेंबर २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘युवास्पंदन-२०१८’ या आंतरविद्यापीठीय पश्चिम विभाग युवा महोत्सवाच्या लोगोचे बुधवारी अनावरण करण्यात आले. या महोत्सवामध्ये महाराष्ट्र , गोवा, गुजरात व राजस्थान या ४ राज्यांमधील १४० विद्यापीठातील २ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. संगीत, नृत्य, नाटय, ललित कला व साहित्य अशा २७ विविध कला प्रकारांच्या सादरीकरणाची सांस्कृतिक मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे.