पुणे : डेक्कन जवळील प्रसिद्ध झेड ब्रिजचा कठडा मेट्रोचे काम सुरु असताना ट्रकचा धक्का लागून कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (दि. २७ ) मध्यरात्री घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पुण्यात झेड ब्रिजजवळ मेट्रोचे काम सुरु आहे . त्या कामातच एक ट्रक रात्री ब्रिजच्या कठड्याला धडकल्यामुळे हा अपघात घडला आहे. परंतु, घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये पावसामुळेच कठडा कोसळल्याची जोरदार चर्चा होती. गेल्या काही दिवसात पावसामुळे भिंत कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे आधीच शहरात भीतीचे वातावरण आहे.त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानंतर त्याच घटनांची पुनरावृत्ती डेक्कन जवळील झेड ब्रिज अपघातात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच या अपघातासंदर्भात पुणे महापालिका कर्मचारी व मेट्रो प्रशासनाशी संपर्क करून या दुर्घटनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून देखील अधिकची माहिती समोर आलेली नाही. परंतु, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात मेट्रोच्याच एका ट्रकच्या धडकेमुळे घडला आहे, ( सविस्तर माहिती लवकरच..)