पाईट पिंपरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे वराळे हे गाव आहे. यामुळे सत्ताधारी असलेल्या माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील यांच्या विरोधात श्री भैरवनाथ महाविकास आघाडी पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते. तरीही शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका वार्डमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवड करण्यात विश्वास बुट्टे पाटील यांना यश मिळाले होते. गावातील मतदारांनी केलेल्या विकासकामाला प्राधान्य देत पाच उमेदवार निवडून दिल्याने सलग पाचव्यांदा बुट्टे पाटील यांनी वराळे ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राखली आहे.
शरद बुटे पाटील यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - बाळू दाजी ठाकर, पूजा विश्वास बुटे, उज्ज्वला नंदू चव्हाण, दिनेश किसन लांडगे, सुनीता मोहन ठाकर, अविनाश अनिल लोंढे तर सुनीता मोहन ठाकर या बिनविरोध निवडून आल्या तर भैरवनाथ महाविकास आघाडी पॅनलच्या शुभांगी नवनाथ बुट्टे या एकमेव उमेदवार निवडून आल्या आहेत.
----------------------------------------------------
* फोटो - वराळे ग्रामपंचायतला निवडून आलेल्या सदस्यांचा सन्मान करताना शरद बुट्टे पाटील.