शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

जिल्हा परिषद शाळा राजकीय आश्वासनांच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:57 AM

इंदापूर नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व २ राजकीय आश्वासनांच्या भोव-यात अडकली आहे. इमारत दुरुस्तीसाठीचा निधी अद्याप उपलब्ध होऊनही न मिळाल्याने शाळा शेवटची घटका मोजत आहेत.

इंदापूर -  इंदापूर नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व २ राजकीय आश्वासनांच्या भोव-यात अडकली आहे. इमारत दुरुस्तीसाठीचा निधी अद्याप उपलब्ध होऊनही न मिळाल्याने शाळा शेवटची घटका मोजत आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी इंदापूर नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ व २ ला २ फेब्रुवारी २०१८ रोजी भेट दिली होती. त्या वेळी शाळादुरुस्तीसाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे जाहीर केले होते. यापैकी शाळा नं. १ साठी १५ लाख व शाळा नं. २ साठी १५ लाख व तारेच्या शाळेला ५ लाख रुपये अशा प्रकारे निधी मंजूर केला होता. परंतु, चार महिने उलटून गेले तरी शाळादुरुस्तीसाठीचा निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून उपलब्ध झालेला नाही.सद्य:स्थितीत शाळा इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे. पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी ए. एस. काथवटे यांनी इमारत जीर्ण व धोकादायक स्थितीत असल्याचे लेखी पत्राद्वारे शाळेला व नगर परिषद प्रशासनाला लेखी कळविले आहे. इमारत केव्हाही अचानक कोसळण्याच्या स्थितीत असल्याने इमारतीत शाळा न भरविता पर्यायी जागेत स्थलांतर करावे. त्या ठिकाणी शाळा भरविण्याच्या सूचना लेखी आदेशाने देण्यात आलेल्या आहेत. तसेच, सदर शाळा इमारतीची तत्काळ दुरुस्ती केल्याशिवाय विद्यार्थी शाळेत न बसविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.अशा प्रकारे शासकीय अधिकाºयांकडून जबाबदारी टाळण्याचे प्रकार चालू आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक वर्गातून करण्यात येत आहे. ही शाळा इमारत दुरुस्त करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे सन २०१३ पासून संबंधित विभाग, इंदापूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी व इंदापूर नगर परिषदेकडे वारंवार पाठपूरावा करीत आहेत. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये; म्हणून १२ जून रोजी मनसेच्या वतीने इंदापूर शहरातून भीक माँगो आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निवेदन संबंधित विभागांना देण्यात आले आहे. जमा होणाºया निधीतून इमारत दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.गटशिक्षणाधिकारी ए. एस. काथवटे यांनी सांगितले, की मंजूर झालेला निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शाळादुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नसल्याची माहिती दिली.जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. इंदापूर नगर परिषद मुख्याधिकाºयांनी सांगितले, की सदर निधी आमच्या विभागाकडे येत नाही. जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे निधी जमा होत असल्याचे ते म्हणाले.पर्यायी व्यवस्था नसल्याने अडचण...पावसाळा सुरू झालेला आहे. अवघ्या ४ दिवसांनी शाळा सुरूहोणार आहे. ४५० हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या जीविताचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित विभागाकडून कसलीही पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली नाही.भविष्यात जीर्ण इमारतीच्या बाबतीत अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी इंदापूर नगर परिषदेची असल्याचे गटशिक्षणाधिकाºयांनी पत्रात नमूद केले आहे. हे पत्र पाठवून त्यांनी जबाबदारी झटकली आहे, तर नगर परिषदेनेसुद्धा तशाच प्रकारचे पत्र गटशिक्षणाधिकाºयांना पाठवून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी झटकली आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र