जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका पाच ते सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सन २०२२ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये ७५ गट असून १५० पंचायत समिती गण आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या सदस्यांची विकास कामाच्या निधीसाठी रचना सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गत दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहेत कोरोना व योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन असा जिल्हा प्रशासनाने पावले उचलली.
बहुतांश सदस्य दररोज सकाळी विविध कामांची लेटर पॅड घेऊन जिल्हा परिषदेमध्ये हजेरी लावत आहेत. बांधकाम विभाग आरोग्य ग्रामीण पाणीपुरवठा लघुपाटबंधारे समाजकल्याण शिक्षण व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सदस्यांची दररोज उठबस वाढली आहे. सदस्य अधिकाऱ्यांना काय काय कामे घेता येतात याची माहिती विचारून घेत आहेत.
--
चौकट
कोरोनामुळे विकासकामांना खीळ
विविध विकासकामांवरील निधी शासनाने आरोग्याकडे वळवला कोरोनामुळे दीड वर्षापासून जिल्हा परिषद सदस्यांच्या विकासकामांना खीळ बसली आहे अनेक गटामध्ये बोटावर मोजण्याएवढे कामे करता आली. जास्तीत जास्त कामे जिल्हा परिषद गटात व्हावी, अशी मानसिकता सदस्यांची आहे. मात्र पुन्हा तिसरा लाटेचा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तविला आहे. त्यामुळे विविध विभागाचा निधी पुन्हा आरोग्याकडे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या गटात विभागातून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.