लोकमत न्यूज नेटवर्कअवसरी : शिक्षण हे माणसाच्या प्रगतीत सर्वांत महत्त्वाचे असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शालेय व इतर विकासकामे येत्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर यांच्या प्रयत्नातून १० लाख रुपये निधी मंजरू झाला होता. या निधीतून शाळेला ११५ मीटर लांबीची संरक्षक भिंत व प्रवेशद्वार बांधण्यात आले. संरक्षक भिंतीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अांबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, संचालक माऊली गावडे, प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, शांताराम बापू हिंगे, अनिल वाळुंज, दौलतभाई लोखंडे, मनोज रोडे, बाबाजी गावडे, उज्ज्वला गावडे, प्रमोद वळसे पाटील, अनिल जाधव, माजी उपसरपंच कान्हु करंडे, अशोक करंडे, रोहिदास तुळे, बाबाजी करंडे, अशोक जोरी, विनायक करंडे, पुनम करंडे, गंगुबाई गोणटे, सचिन वायाळ, बजरंग करंडे, सुधीर भूमकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळांचा विकास करणार : विवेक वळसे-पाटील
By admin | Published: May 09, 2017 3:29 AM