शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

जिल्हा परिषदेची खासगी शाळांना टक्कर

By admin | Published: April 18, 2017 2:51 AM

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील तब्बल ४२ हजार मुलांना

पुणे : प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील तब्बल ४२ हजार मुलांना एक एप्रिलपासून पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला आहे. या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण ३ हजार ७०० शाळा आहेत. या शाळांमध्ये गुणवत्ता विकासवाढीसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात. परंतु, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेऐवजी खासगी शाळांना पालक प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागामध्ये खासगी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे खासगी शाळांचे आव्हान लक्षात घेऊन प्राथमिक शाळांमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून आता नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा टिकविण्यासाठी विषेश प्रयत्न म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच खासगी शाळांच्या धर्तीवर प्राथमिक शाळांची जाहिरात स्थानिक पातळीवर करणार आहे. तसेच आपल्या शाळेतून शिकलेले माजी विद्यार्थी यांचे सध्याचे सामाजिक स्टेटस समाजासमोर आणण्यासाठी विषेश प्रयत्न करण्यात येणार आहेत. जेणेकरून प्राथमिक शाळेबद्दल पालकांच्या मनामध्ये आश्वासकता निर्माण व्हावी, याकडे लक्ष देण्यात येणार आहे, असे दौलत देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)