लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: जिल्हा परिषदेच्या जवळपास ३ हजार ६४८ शाळांपैकी जवळपास १ हजार ७९५ शाळांमधील स्वच्छता गृहांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. चांगले स्वछतागृह नसल्याने अनेक शाळांत विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधी हे शाळेच्या आवारातच उरकावे लागत आहे, यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. १ हजार ७९५ पैकी १ हजार ३३४ स्वछता गृहांची तातडीने दुरुस्ती करणे हे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील मोडकळीस आलेल्या स्वच्छता गृहांची माहिती मुख्याध्यापकांकडून ऑनलाईन मागण्यात आली होती. त्यातून ही माहीती उघडकीस आली आहे. या शाळांमध्ये नैसर्गिक विधीसाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र असे एक एक युनिट उभारण्यात आले आहे. मात्र, या स्वच्छता गृहांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ३ हजार ६४८ शाळांपैकी मुलांचे ६६४ तर मुलींच्या ६७० स्वछता गृहांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांची तातडीने दुरुस्थीची गरज आहे. या स्वच्छता गृहांच्या दुरूस्ती साठी जिल्हा परिषदेने 7 कोटी 7 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर नव्याने स्वछतागृह बांधण्यासाठी 12 कोटी 67 लाख 75 हजार असे 19 कोटी 75 लाख 70 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच स्वछता गृहांच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.
तालुका दुरवस्था झालेले स्वछता गृह मोडकळीस आलेले स्वछतागृह
आंबेगाव - ८० ३९
बारामती - ८३ ४४भोर ९३ ६९दौंड - ९८ ३९हवेली १०१ ९इंदापूर ११७ ४६जुन्नर - १६० ३४खेड - १२४ ५७मावळ - १२३ १६मुळशी ९४ २१पुरंदर - १०२ ३३शिरूर ६९ २४ वेल्हे - ८९ ३०
जिल्हा परिषदेच्या एकुण शाळा - ३६४८दुरवस्था झालेली स्वच्छतागृहे - १७९५मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे - ४६१तातडीची दुरुस्ती आवश्यक असलेली स्वच्छतागृहे - १३३४दुरुस्तीसाठी निधी - ७ कोटी ७ लाख ९५ हजार रुपयेनव्याने स्वच्छतागृहे उभारणे - १२ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये
शाळांतील नादुरुस्त असलेल्या स्वछतागृहांची माहिती मुख्याध्यापकांकडून मागवण्यात आली होती. त्यानुसार 1 हजार 795 स्वच्छता गृह नादुरुस्त असल्याची माहिती पुढे आली. तर काही ठिकाणी नव्याने उभारण्याची गरज आहे.
स्वछतागृहांच्या दुरुस्ती साठी आणि नव्याने स्वछतागृह बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यानुसार दुरुस्तीसाठी ७ कोटी सात लाख ९५ हजार रुपये तर, मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांचे नव्याने बांधकाम करण्यासाठी १२ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली जाणार आहे. - रणजित शिवतरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद