जिल्ह्यात १ हजार ९८३ नौका किनाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 02:55 AM2018-06-02T02:55:15+5:302018-06-02T02:55:15+5:30
राज्याच्या सागरी किनारपट्टीतील खोल समुद्रातील सक्तीची मासेमारी बंदी शुक्र वारपासून ते मंगळवार ३१ जुलै २०१८ अशा ६१ दिवसांकरिता (दोन महिने) लागू राहणार आहे
अलिबाग : राज्याच्या सागरी किनारपट्टीतील खोल समुद्रातील सक्तीची मासेमारी बंदी शुक्र वारपासून ते मंगळवार ३१ जुलै २०१८ अशा ६१ दिवसांकरिता (दोन महिने) लागू राहणार आहे. रायगडच्या किनारपट्टीतील मत्स्यव्यवसाय विभागाकडे नोंदणीकृत एकूण १ हजार ९८३ मच्छीमारी नौका किनाºयावर लावण्यात आल्या आहेत.
पावसाच्या पाण्यापासून नौकांचे रक्षण व्हावे याकरिता नारळाचे झाप आणि प्लॅस्टिक कापडाने त्या शाकारून (झाकून) ठेवण्यात येत आहेत. आगामी दोन महिने सागरी मासेमारी बंद राहणार असल्याने या नौकांवरील खलाशी व कामगार सुटीवर गेले आहेत.
मत्स्य प्रजननाचा कालावधी मान्सून प्रारंभानंतर सुमारे दोन महिन्यांचा असतो. या कालावधीत मासेमारी सुरू राहिल्यास मत्स्य प्रजोत्पादनावर परिणाम होवून मत्स्य दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. यास आळा घालण्याकरिता दरवर्षी सक्तीची मासेमारी बंदी लागू केली जाते. यावर्षीच्या मासेमारी बंदीसंदर्भातील शासकीय सूचना मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थांना दिल्या आहेत.
मासेमारी बंदीचे उल्लंघन करणाºया मच्छीमारांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना देखील मत्स्यव्यवसाय विभागाने दिल्या आहेत. या कालावधीत १२ सागरी मैलापर्यंत यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाºया मच्छीमारांना कोणत्याही संबंधित योजनांचा लाभ अधिनियमानुसार राज्य शासनाकडून मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी मासेमारी बंदीचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात होणारी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करणाºया नौकांना लागू करण्यात आली आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाºया बिगर यांत्रिकी नौकांना मात्र ही बंदी लागू राहणार नाही.
दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी नौकांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात त्याच बरोबर मासेमारी जाळ्यांची दुरु स्ती देखील या कालावधीत केली जातात अशी कामे केली जातात. काही दिवसातच ही कामे सुरू होतील.
जंजिºयावरील बोट सेवाही बंद
मुरु ड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील बोटिंग सेवा पूर्णत: बंद करण्यात आली आहे. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचा वेग वाढला आहे. त्यामुळे किल्ल्यात जाणाºया बोटी लाटांच्या वेगामुळे जोरदार हलतात. अशा परिस्थितीत प्रवासी व पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसे पत्र सर्व जलवाहतूक सोसायट्यांना मुरु डचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी बजावले आहे. २६ मे ते ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत ही जलवाहतूक बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत वॉटर स्पोर्ट्स, प्रवासी लॉन्च, साहसी वॉटर स्पोर्ट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राजपुरी, दिघी व काशिद येथील या सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना काही दिवस जंजिरा किल्ला पहाता येणार नाही.
काशिद येथे असंख्य पर्यटक येत असून येथे वॉटर स्पोर्ट्स करणाºया बोटी अद्याप सुरू आहेत. त्यामुळेच मागच्या आठवड्यात बोटीवरील मुलगा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. तरी येथील बंदर निरीक्षक यांनी शनिवार व रविवार रोजी काशिद समुद्र किनारी उपस्थित राहून ज्या बोटी सुरु आहेत त्या बंद करण्यास सांगितल्या.