शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

जिल्ह्यात १ हजार ९८३ नौका किनाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 2:55 AM

राज्याच्या सागरी किनारपट्टीतील खोल समुद्रातील सक्तीची मासेमारी बंदी शुक्र वारपासून ते मंगळवार ३१ जुलै २०१८ अशा ६१ दिवसांकरिता (दोन महिने) लागू राहणार आहे

अलिबाग : राज्याच्या सागरी किनारपट्टीतील खोल समुद्रातील सक्तीची मासेमारी बंदी शुक्र वारपासून ते मंगळवार ३१ जुलै २०१८ अशा ६१ दिवसांकरिता (दोन महिने) लागू राहणार आहे. रायगडच्या किनारपट्टीतील मत्स्यव्यवसाय विभागाकडे नोंदणीकृत एकूण १ हजार ९८३ मच्छीमारी नौका किनाºयावर लावण्यात आल्या आहेत.पावसाच्या पाण्यापासून नौकांचे रक्षण व्हावे याकरिता नारळाचे झाप आणि प्लॅस्टिक कापडाने त्या शाकारून (झाकून) ठेवण्यात येत आहेत. आगामी दोन महिने सागरी मासेमारी बंद राहणार असल्याने या नौकांवरील खलाशी व कामगार सुटीवर गेले आहेत.मत्स्य प्रजननाचा कालावधी मान्सून प्रारंभानंतर सुमारे दोन महिन्यांचा असतो. या कालावधीत मासेमारी सुरू राहिल्यास मत्स्य प्रजोत्पादनावर परिणाम होवून मत्स्य दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. यास आळा घालण्याकरिता दरवर्षी सक्तीची मासेमारी बंदी लागू केली जाते. यावर्षीच्या मासेमारी बंदीसंदर्भातील शासकीय सूचना मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थांना दिल्या आहेत.मासेमारी बंदीचे उल्लंघन करणाºया मच्छीमारांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना देखील मत्स्यव्यवसाय विभागाने दिल्या आहेत. या कालावधीत १२ सागरी मैलापर्यंत यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाºया मच्छीमारांना कोणत्याही संबंधित योजनांचा लाभ अधिनियमानुसार राज्य शासनाकडून मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी मासेमारी बंदीचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात होणारी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करणाºया नौकांना लागू करण्यात आली आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाºया बिगर यांत्रिकी नौकांना मात्र ही बंदी लागू राहणार नाही.दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी नौकांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात त्याच बरोबर मासेमारी जाळ्यांची दुरु स्ती देखील या कालावधीत केली जातात अशी कामे केली जातात. काही दिवसातच ही कामे सुरू होतील.जंजिºयावरील बोट सेवाही बंदमुरु ड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील बोटिंग सेवा पूर्णत: बंद करण्यात आली आहे. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचा वेग वाढला आहे. त्यामुळे किल्ल्यात जाणाºया बोटी लाटांच्या वेगामुळे जोरदार हलतात. अशा परिस्थितीत प्रवासी व पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसे पत्र सर्व जलवाहतूक सोसायट्यांना मुरु डचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी बजावले आहे. २६ मे ते ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत ही जलवाहतूक बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत वॉटर स्पोर्ट्स, प्रवासी लॉन्च, साहसी वॉटर स्पोर्ट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राजपुरी, दिघी व काशिद येथील या सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना काही दिवस जंजिरा किल्ला पहाता येणार नाही.काशिद येथे असंख्य पर्यटक येत असून येथे वॉटर स्पोर्ट्स करणाºया बोटी अद्याप सुरू आहेत. त्यामुळेच मागच्या आठवड्यात बोटीवरील मुलगा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. तरी येथील बंदर निरीक्षक यांनी शनिवार व रविवार रोजी काशिद समुद्र किनारी उपस्थित राहून ज्या बोटी सुरु आहेत त्या बंद करण्यास सांगितल्या.