शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

कर्जतमध्ये १० ग्राम बालपोषण केंद्रे सुरू; जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर यंत्रणेला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:03 AM

तालुक्यातील मोरेवाडी येथे आॅक्टोबर २०१६मध्ये एका मुलीच्या मृत्यूनंतर कुषोषणाच्या प्रश्नाने रायगड जिल्हा चर्चेत आला होता. आॅक्टोबरपासून प्रलंबित असणारे ग्रामबाल पोषण व उपचार केंद्र अखेर सोमवारपासून सुरू करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती उमा मुंढे याचे हस्ते कडाव येथे प्रातिनिधिक स्वरूपात विसीडीसीची सुरुवात करण्यात आली.

- कांता हाबळे

नेरळ : तालुक्यातील मोरेवाडी येथे आॅक्टोबर २०१६मध्ये एका मुलीच्या मृत्यूनंतर कुषोषणाच्या प्रश्नाने रायगड जिल्हा चर्चेत आला होता. आॅक्टोबरपासून प्रलंबित असणारे ग्रामबाल पोषण व उपचार केंद्र अखेर सोमवारपासून सुरू करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती उमा मुंढे याचे हस्ते कडाव येथे प्रातिनिधिक स्वरूपात विसीडीसीची सुरुवात करण्यात आली.मागील चार-पाच वर्षांपासून तालुक्यातील कुपोषित मुलांच्या प्रश्नावर स्थानिक स्वयंसेवी संस्था दिशा केंद्राने पाठपुरावा करून नोव्हेंबरमध्ये जिल्हाधिकारी, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील कुपोषणाच्या गंभीर प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले होते. निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व अधिकाºयांची २ फेब्रुवारी रोजी कर्जत येथे आढावा बैठक घेत बालउपचार केंद्र व ग्राम बालपोषण केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी बालउपचार केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी वाघमारे डी. पी., पर्यवेक्षिका रजनी सोनवणे, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या. एकात्मिक बालविकास विभागाचे दोन प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत कडाव, तिवरे, फणसवाडी, टेभरे, वेनगाव, अंबिवली, नेरळ, एक्सल चाहूची वाडी, भागूची वाडी या १० अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालपोषण केंद्रे सुरू झाली आहेत. एकूण ९१ केंद्रे तालुक्यात प्रस्तावित असून उर्वरित ८१ केंद्रे १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. बालउपचार केंद्रातून तीव्र आणि मध्यम कुपोषित मुलांसाठी २१ दिवस सहा वेळा पोषक पूरक आहार पुरवण्यात येणार आहे. मुलांना कुपोषणातून बाहेर काढणे हा या पोषण केंद्रांचा मुख्य उद्देश आहे. वरील १० अंगणवाड्यांमध्ये ‘बाल कोपरा’ही तयार करण्यात आला असून या बालकोपºयात मुलांच्या दृष्टीस पडेल व हात पोहोचेल अशा स्थितीत शेंगदाणे, राजगिरा लाडू, चिक्की हे पदार्थ ठेवले जाणार आहेत. तीव्र कुपोषित मुलांपैकी ज्यांना उपचाराची गरज आहे, अशा मुलांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या बालउपचार केंद्रात दाखल करून बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार केले जाणार आहेत.व्हीसीडीसी /ग्राम बाल उपचार केंद्रतीव्र, मध्यम कुपोषित मुलांना सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळात, सहा वेळा पूरक पोषण आहार. दूध, केळी, अंडी, पोहे, उपमा, डाळ-भात खिचडी, उसळ हा खाऊ मुलांना भरवला जाणार आहे.सीटीसी बाल उपचार केंद्रकुपोषित मुलांना मोफत उपचार. सोबत राहणाºया पालकाला बुडीत मजुरी, राहण्याची व जेवणाची सोय. सरकारकडून कुपोषण निर्मुलनासाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्यामुळे कुपोषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.जांभूळपाडा अंगणवाड्यांमध्ये ३३% मुले कुपोषितपाली : मुंबई येथील डॉक्टर्स फॉर यु या संस्थेने केलेल्या पाहणीत सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा परिसरातील अंगणवाड्यांमध्ये ३३ टक्के कुपोषित मुले आढळून आली आहेत. यामध्ये २१ मुले ही तीव्र कुपोषित असल्याची माहिती डीएफवाय संस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली वेणू यांनी दिली.भारतीय बालरोगतज्ज्ञ परिषदेच्या शिफारसीनुसार अंगणवाडी योजनेत मुलांचे वजन घेऊन वयाप्रमाणे हिशोब करून वजन कमी, जास्त, योग्य असे मापदंड लावून ही पाहणी करण्यात आली आहे. मुलांची आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत सात अंगणवाड्यांतील ९५ मुलांची तपासणी केली गेली. यात ३२ मुले कुपोषित आढळली. त्यात २१ मुले ही तीव्र कुपोषित तर ११ मुले मध्यम कुपोषित आहेत.संस्थेच्या वतीने या कुपोषित बालकांना त्या त्या प्रकारची अन्न पाकिटे वाटण्यात आली आहेत. या मुलांमध्ये होणारी सुधारणा यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय डोळे, दात, एचबी आदी तपासण्या करण्याबरोबर ओपीडी सुरू करून ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे वेणू यांनी सांगितले.डॉ. रविकांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली डीएफवाय संस्था सर्वांसाठी आरोग्य या दृष्टीकोनातून काम करीत आहे. जांभूळपाडा विभागात सुरू असलेल्या आरोग्य मोहिमेबाबत डॉ. वैशाली वेणू म्हणाल्या, जांभूळपाडा, वºहाड, घोड्पापड, गाठेमाळ, दांड कातकरवाडी, हेदवली, करचुंडे या गावातील अंगणवाडी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये अंगणवाड्यांची दुरु स्ती, रंगकाम आणि पाण्याची सोय, मुलांच्या इतर सोयीसुविधा पूर्ण करणार असून या प्रकल्पाची पहिली अंगणवाडी पूर्ण झाली आहे. मार्चपर्यंत उर्वरित सर्व अंगणवाड्या पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.- ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामस्थ आणि मुलापर्यंत डीएफवाय संस्था आणि त्यांचे डॉक्टर पोहचून मूलभूत सोयीसुविधा पुरवित आहेत. शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात सुरू आहेत. अंगणवाडी दुरु स्ती हा प्रकल्प सुधागड तालुक्यातील इतर आदिवासी भागांतही राबवावा. - विनायक म्हात्रे, गटविकास अधिकारी

टॅग्स :Raigadरायगड