जिल्ह्यात मोहरमनिमित्त १०० मिरवणुका

By admin | Published: October 13, 2016 04:04 AM2016-10-13T04:04:51+5:302016-10-13T04:04:51+5:30

मुस्लीम धर्मियांचा ताजिया मोहरमनिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी १०० मिरवणुका काढण्यात आल्या. याप्रसंगी मुस्लीम समाजातील नागरिकांनी प्रचंड

100 mangroves in the district on the occasion of Moharram | जिल्ह्यात मोहरमनिमित्त १०० मिरवणुका

जिल्ह्यात मोहरमनिमित्त १०० मिरवणुका

Next

अलिबाग : मुस्लीम धर्मियांचा ताजिया मोहरमनिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी १०० मिरवणुका काढण्यात आल्या. याप्रसंगी मुस्लीम समाजातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
मुस्लीम समाज या दिवसाला वर्षारंभ मानतात. मुस्लिमांचे श्रध्दास्थान असलेले प्रेषित महंमद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन अली यांचा याच पवित्र महिन्यात मृत्यू झाला होता. दु:खद प्रसंगाची स्मृती म्हणूनही मोहरम साजरा केला जातो.
मोहरममध्ये ताबूत करण्याची प्रथा १४ व्या शतकामध्ये अमिर तैमुर लंगने सुरू केल्याचा उल्लेख आढळतो. सर्वांना पाणी मिळावे यासाठी तेथे पाण्याने भरलेले मडके ठेवलेले आपल्याला दिसून येते. ताबुतचा प्रघात भारत, पर्शिया, इजिप्तमध्ये आढळतो. मुस्लिमांचे पवित्र श्रध्दास्थान असलेल्या मक्केकडे याचे तोंड केलेले दिसून येते. मोहरमनिमित्त जिल्ह्यामध्ये सायंकाळी मिरवणुका काढण्यात आल्या.
एका मोठ्या काठीला नवीन पवित्र वस्त्र गुंडाळलेले होते. त्यावर पंजाचे चिन्ह होते. मिरवणुकीत मुस्लीम बांधवांनी आपल्या अंगावर धारदार शस्त्रांनी वार करून घेतले. त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होते. त्यावेळी तेथे असणारी उदी ते सर्वांगाला लावत होते. यामध्ये तरुणांसह वृध्दांचाही समावेश होता. मिरवणुकीला मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.
दरम्यान, या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये जिल्ह्यात सीआरपीएफचे एक प्लाटून, चार आरसीबी प्लाटून, सहा स्ट्रायकिंग फोर्स ४०० होमगार्ड यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: 100 mangroves in the district on the occasion of Moharram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.