शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घ्यायला डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची १००% नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:38 PM

प्रतिरोधासाठी लस आवश्यक : त्रास झाल्यास तत्काळ होणार औषधोपचार

पंकज राऊत

बोईसर : कोरोनाची लस सर्वात आधी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. अन्य अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी भीतीची भावना आहे. साईड इफेक्टच्या भीतीने दुसऱ्या टप्प्यात आपण लस घ्यावी अशी अनेकांची भावना आहे, मात्र पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी १०० टक्के नोंदणी केली असून कर्मचाऱ्यांमध्ये किंचितही भीती नसल्याचे अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पालघर जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठीची रंगीत तालीम (ड्राय रन) नुकतीच पार पडली असून जिल्ह्यातील एकूण १६ हजार  कर्मचाऱ्यांना पहिल्या

टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने आहे. लस घेतेवेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तत्काळ त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत.  जिल्ह्याला ही लस प्राप्त होताच पहिल्या टप्प्यात आशा, आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांच्या ११ हजार ९१३, खासगी शहरी व ग्रामीण भागातील  ५ हजार ४९८ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षांवरील सर्व नागरिक व ५० वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनीही कोरोना लसीकरण मोहिमेत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

लसीविषयी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता   लसीकरणासंदर्भात आवश्यक बाबींची पूर्वतयारी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमांचे पालन करून नुकतीच रंगीत तालीम घेतली गेली. या वेळी प्रत्यक्षात लस टोचली नसली तरी लस टोचण्यासाठी झालेली पूर्वतयारी याची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली. जिल्ह्यातील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये लसीची उत्सुकता आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीविषयी किंचितही भीती नसून १०० टक्के कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे.     - डॉ. अनिल थोरात,     जिल्हा शल्य चिकित्सक,        जिल्हा रुग्णालय, पालघर.

साथीच्या (संसर्गाच्या) सर्व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्हॅक्सिलेशनची अत्यंत आवश्यकता आहे.  आजाराच्या प्रतिरोधकासाठी प्रत्येकाने कोरोनाची लस घेणे गरजेचे असून आम्ही डॉक्टर मंडळी ही लस घेण्यास तयार आहोत.               - डॉ. शोभा संखे               अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, बोईसर

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस