सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे 

By वैभव गायकर | Published: August 11, 2023 04:43 PM2023-08-11T16:43:14+5:302023-08-11T16:43:57+5:30

कोरोना काळापासुन ऑनलाईन फसवणुकीसाठी इंटरनेट महत्वाचे माध्यम 

1000 complaints of cyber fraud every day said ips sanjay shintre | सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे 

सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे 

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क,  वैभव गायकर, पनवेल: भारत देशात 140 कोटी नागरिक वास्तव्यास आहेत.यापैकी 85 कोटी नागरिक वेगवगेळ्या माध्यमातुन इंटरनेट चा वापर करीत असतात.यामुळेच सायबर क्रिमिनल इंटरनेट वर विविध माध्यमातुन अशा नागरिकांवर लक्ष ठेवून असतात आणि अनेकांना आपल्या जाळ्यात ओडून त्यांची ऑनलाईन फसवणूक करत असल्याची माहिती आयपीएस अधिकारी आणि सायबर विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख संजय शिंत्रे यांनी.शासनाकडे दररोज एक हजार तक्रारी यासंदर्भात दररोज प्राप्त होत असल्याची धक्कादायक माहिती शिंत्रे यांनी दि.10 रोजी सायबर गुन्हेगारीविषयक आयोजित हँकेथॉन 2023 या कार्यक्रमात दिली.

कोरोना काळापासून ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोरोना काळात बहुतांशी नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिल्याने इंटरनेवर सायबर क्रिमिनल सक्रिय झाले आहेत.इंटरनेटवर ज्या गोष्टी आपण सर्च करतो त्यावर लक्ष ठेवून हुबेहूब तशाच प्रकारचे ऍप प्ले स्टोर मध्ये इन्स्टोल केले जातात.या फेक ऍपचा वापर केल्यास त्वरित आपली माहिती या सायबर क्रिमिनल कडे जाते.फेक एसएमएस आणि लिंक देखील याचाच भाग असल्याचे शिंत्रे यांनी स्पष्ट केले.2020 मध्ये मुंबई मध्ये अचानक शहराच्या वेगवगेळ्या भागात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला होता.त्यामागे देखील हॅकर्स असल्याची शक्यता शिंत्रे यांनी यावेळी व्यक्त केली.सायबर क्रिमिनल जेष्ठ नागरिक,महिला आदींना टार्गेट करत असतात.त्यामुळे अनोळखी फोन कॉल्स,एसएमएस आदींबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.नवी मुंबई महापे एमआयडीसी मध्ये महाराष्ट्र सरकार लवकर सायबर सेक्युरिटी प्रकल्प उभारणार आहे.याठिकाणी सायबर सुरक्षेबाबत काम पाहिले जाणार असुन विद्यार्थ्यांना याठिकाणी ईंटनशील करण्याची संधी भेटणार असल्याची माहिती शिंत्रे यांनी दिली.

1930 हेल्पलाइनचा वापर करा -

सायबर क्राईम संदर्भात तक्रार करण्यासाठी 1930 या हेल्पलाइनचा वापर करावा.या हेल्पलाईनवर तक्रार केल्याने त्वरित तक्रार दाखल करून ती थेट स्थानिक पोलीस ठाण्याकडे वर्ग केली जाते.

Web Title: 1000 complaints of cyber fraud every day said ips sanjay shintre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.