अलिबागमध्ये ११ आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:57 PM2018-11-28T23:57:37+5:302018-11-28T23:57:49+5:30

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : दहा गुन्ह्यात ४६३ ग्रॅम सोने, चार मोबाइल हस्तगत

11 accused in Alibaug arrested | अलिबागमध्ये ११ आरोपी जेरबंद

अलिबागमध्ये ११ आरोपी जेरबंद

Next

अलिबाग : जिल्ह्यात दिवसा व रात्री घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. विशेष पोलीस तपास पथकाने केलेल्या कारवाईत घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून एकूण चार टोळ््यांच्या ११ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४६३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १७ हजार रुपयांची रोख रक्कम ,चार मोबाइल फोन्स असा एकूण १५ लाख रुपये किमतीचा ऐवज परत मिळविण्यात यश आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मोहम्मद रिझवान अब्दुल मन्नान अन्सारी (३०, सध्या रा.पनवेल रेल्वे स्टेशनजवळ आणि मूळ रा.बेरखा-बिजनौर, उत्तरप्रदेश) यास शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने त्याचा साथीदार मोहम्मद रईस (रा.बेरखा-धामपूर, उत्तरप्रदेश) यांच्या सोबत अलिबाग, पोयनाड, वडखळ, दादर सागरी आणि माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. तसेच मोहम्मद रिझवान अन्सारी याने चोरलेले सोन्याचे दागिने बिजनौर येथील व्यापाऱ्याला विकले होते, त्या सोनाराला अटक करून त्याच्याकडून १७० ग्रॅम सोन्याचे दागिने तर इतर सोनाराकडून १५२ ग्रॅम सोन्याचे दागिने असे एकूण ३२२ ग्रॅम सोन्याचे ९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने परत मिळविण्यात यश आले आहे. रिझवान अन्सारी व मोहम्मद रईस हे दोघे पेणजवळ राहतात व चोºया व घरफोडया करून उत्तरप्रदेश येथे परत जात असत.


याप्रकरणी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून सखोल तपास केला असता त्याने रेवदंडा व अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. तेथे चोरीस गेलेले ११० ग्रम सोन्याचे दागिने, १६ हजार रोख रक्कम, एक मोबाइल असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज परत मिळविण्यात आला आहे. या मुलांचे आई-वडील मोलमजुरी करतात आणि या मुलास लहानपणापासून चोरीची सवय असल्याचे पोलिसांनी सांगितले.


तर, शकील शेख आणि सिकंदर अन्वर शेख यांनी त्यांचा साथीदार मोईन शेख याच्या साथीने कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला घरफोडीचा गुन्हा आपण केल्याची कबुली दिली आहे. सिकंदर शेख व शिकल शेख यांच्या वाटणीस आलेले सोने निखील सूरज भोईर आणि कैलास कृष्णा म्हात्रे यांनी विक्री करण्यासाठी मदत केल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.


मोईन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द ठाणे जिल्ह्यात नालासोपारा आणि वसई भागात एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले व लपवून ठेवलेले ५५ ग्रॅम सोन्याचे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी परत मिळविले आहेत.


जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: 11 accused in Alibaug arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड